संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५
प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव येथे महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या संपन्न..
साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी पाटण
हेळगाव, 18 सप्टेंबर 2025:
प्राथमिक आरोग्य केंद्र, हेळगाव येथे आज "स्वास्थ नारी -सशक्त परिवार" अभियान अंतर्गत महिलांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले आरोग्य तपासून घेतले.
या शिबिरात महिलांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसह, रक्तदाब, रक्तशर्करा, हिमोग्लोबिन, गर्भवती महिलांसाठी नियमित तपासणी (एएनसी तपासणी) बालकांसाठी लसीकरण सुविधा महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी स्वच्छता आणि पोषण संबंधित माहिती आणि समुपदेशन करण्यात आले. तसेच महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करून विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माळी महिलांना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व सांगितले आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे ग्रामीण
भागातील महिलांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास मदत झाली असून, महिलांचे आरोग्य सशक्त बनवण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र माळी साहेब, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जाधव साहेब, डॉ. पाटील मॅडम, तालुका विस्तार अधिकारी श्री. माने, श्री. कदम, श्री. निबांळकर, श्री. मोहिते रावसाहेब तसेच लॅब टेक्निशियन, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेविका, कर्मचारी उपस्थित होते
रविवार, ७ सप्टेंबर, २०२५
*राजाराम डाकवे (तात्या) यांचे तृतीय पुण्यस्मरण मंगळवारी*
*राजाराम डाकवे (तात्या) यांचे तृतीय पुण्यस्मरण मंगळवारी*
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार दि.9 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता प्रतिमा पुजन, पुष्पवृष्टी, मोफत सर्व रोग आरोग्य तपासणी शिबीर, महाप्रसाद, तर रात्री 7.00 ते 9.00 वाजेपर्यंत ह.भ.प.जयश्रीताई महाराज धायटी यांचे सुश्राव्य कीर्तन इ.कार्यक्रमांचे चे आयोजन मु.डाकेवाडी, पो.काळगांव, ता.पाटण, जि.सातारा या ठिकाणी केले आहे.
राजाराम डाकवे यांच्या निधनानंतर डाकवे परिवाराने रक्षाविसर्जन ऐवजी वृक्षारोपण, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन, भित्तीचित्र काव्य स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, तीर्थरुप तात्या, तात्या, तात्यांची स्पंदने ई-बुक इ.पुस्तकांची प्रकाशने, साहित्य पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा इ.उपक्रम राबवत वडीलांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करत तात्यांच्या सामाजिक कार्याला एकप्रकारे वंदनच केले.
तृतीय पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमास मित्रपरिवार, नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गयाबाई डाकवे, भरत डाकवे, विठ्ठल डाकवे, विश्वनाथ डाकवे, संदीप डाकवे व समस्त डाकवे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...
-
ढेबेवाडी - राजकीय वारसा, जनतेचा कौल आणि शिवसेनेची ताकद!मंद्रुळकोळे जि. प. गणात कु.मृणाल महेश पाटील यांना उमेदवारी, पाटण तालुक...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
