शुक्रवार, १३ जून, २०२५

कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप.

 


 

नवी मुंबईत पत्नीची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी खारघरमध्ये पाकिस्तान आणि भारतात राहण्याच्या वादातून पत्नीचा खून करुन स्वतः आत्महत्या केली होती. त्यानंतर आता कोपरखैरणे भागातही पत्नीची हत्या करुन पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. ३८ वर्षीय बेरोजगार पतीने पत्नीची हत्या करुन स्वतःचे मनगट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी एगुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी सकाळी कोपरखैरणे येथील सेक्टर-१९ मध्ये ही घटना घडली. आरोपी गणेश मारुती शिरसाट याने घरगुती भांडणात त्याची ३४ वर्षीय पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर चाकूने वार केले आणि तिची हत्या केली. या क्रूर कृत्यानंतर गणेशने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या गणेशला मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी गणेश शिरसाट हा पत्नीच्या चरित्र्यावरून संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाल्याचे म्हटलं जात आहे.

गणेश आणि गौरी हे त्यांच्या दोन मुलांसह जय अंबे इमारतीत राहत होते. गौरी एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती, तर गणेश बेरोजगार होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते आणि त्याच वादातून गौरीची हत्या झाली. वारंवार फोन करुनही न उचलल्याने गौरीची मैत्रिण वैशाली पाटील तिच्या घरी गेली होती. दुपारी १२:३० च्या सुमारास घरात प्रवेश केल्यावर वैशालीला गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि गणेश तिच्या शेजारी जखमी अवस्थेत आढळला. तिने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही रुग्णालयात ने. गौरीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तर गणेशविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरगुती वादातून हा गुन्हा घडल्याचे दिसून येत आहे. गणेशची प्रकृती स्थिर झाल्यानंतर, त्याला अटक करून अधिक चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...