मंथन परीक्षेत कु. शौर्या कदम राज्य गुणवत्ता यादीत.
पाटण - फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये रघुकुल बालमंदिर व प्राथमिक विद्यालय नाडे नवारस्ता या विद्यालयातील इयत्ता २री मध्ये शिकत असणारी कु. शौर्या संतोष कदम या विद्यार्थ्यांनीने राज्य गुणवत्ता यादीत ७वा क्रमांक व सातारा जिल्ह्यात दुसरी आलेली आहे, या अगोदर तिने आय.एम.विनर या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यात तिसरा क्रमांक ,तसेच अभिरूप स्कॉलरशिप परीक्षा मध्ये केंद्रात पाहिला क्रमांक मिळविलेला आहे,
कु.शौर्या कदम हिचे वडील माध्यमिक शिक्षक असून आई गृहिणी आहे,तसेच तिचे आजोबा सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत,या स्पर्धा परीक्षेमध्ये तिला श्री.महेश पाटील सर यांचे बहुमोल असे मार्गदर्शन मिळाले.
याबद्दल तिचे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री नामदार श्री.शंभूराज देसाईसाहेब ,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.रविराज देसाई दादा, रघुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.श्री.विजय देसाई सर,संस्थेचे सचिव मा.सौ. डॉ.रूपाली देसाई मॅडम, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सविता सुर्वे , मार्गदर्शक शिक्षक श्री.महेश पाटील सर, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,आजी माजी विद्यार्थी पालक ,यांनी तिचे अभिनंदन केले, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा