प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी.
सातारा दि.१९ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सुटीच्या दिवशी
सातारा शहरातील महत्वाच्या ठिकाणी भेटी दिल्या...
आज सातारा जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांनी युद्ध स्मारक, पोवई नाका शिवसृष्टी, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील उड्डाण पूल आणि अजिंक्यतारा परिसरास भेट देऊन पाहणी केली. तसेच या संदर्भात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केली.
26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्याने शाहू स्टेडियम, शहरातील रस्ते त्यांची स्वच्छता व विद्युत रोषणाई संदर्भात मुख्याधिकारी श्री अभिजित बापट याना सूचना दिल्या. अजिंक्य तारा परिसराची देखील पाहणी जिल्हाधिकारी सातारा यांनी केली आहे.याप्रसंगी जिल्हाधिकारी सातारा यांचे समवेत पालकमंत्री यांचे कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी सुनील गाढे ,रविराज जाधव हे देखील उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा