बुधवार, ५ जून, २०२४

*चक्क कवडीवर साकारली शिवरायांची सिंहासनारुढ़ प्रतिमा*

*चक्क कवडीवर साकारली शिवरायांची सिंहासनारुढ़ प्रतिमा*
तळमावले/वार्ताहर
दरवर्षी 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो. यंदा किल्ले रायगडावर 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने हजारो शिवप्रेमी नेहमीच अनोख्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन करण्याचा प्रयत्न करत असतात.
याच पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील डाकेवाड़ी (काळगांव) येथील शेतीमित्र डॉ.संदीप डाकवे यांनी चक्क कवडीवर चित्रकलेतून शिवराज्याभिषेक सोहळा साकारला आहे. काळ्या रंगामध्ये सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराज रेखाटले आहेत. याद्वारे अनोखी शिवभक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
जवळपास 1.5 सेमी×1 सेमी इतक्या कमी पृष्ठभागावर भव्य सोहळा रंगांच्या माध्यमातून त्यांनी हे दृश्य रेखाटले आहे. चित्रकार डॉ.डाकवे यांनी सादर केलेला हा कलाप्रकार छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो, असंच यातून भासत आहे. यापूर्वी त्यांनी शाळेच्या भिंतीवर ऑइल पेंट ने आणि कागदावर दोन वेळा पोस्टर रंगातून शिवराज्यभिषेक साकारला होता.

रविवार, २ जून, २०२४

*कोळे गावातील युवक वृक्ष लागवडीसाठी सरसावले*

*कोळे गावातील युवक वृक्ष लागवडीसाठी  सरसावले*
( युथ फाउंडेशन च्या वतीने वृक्षारोपणास सुरुवात)

   कोळे : गावातील काही तरुण मंडळी एकत्र येत युथ फाऊंडेशन ग्रुप च्या वतीने ,सामाजिक कामास प्रारंभ केला असून त्याची सुरुवात झाडे लावण्या पासून केली असून येत्या पावसाळ्यात विविध भागात शेकडो झाडे ह्या ग्रुप चा माध्यमातून लावण्याचा मानस असून ती जगवली देखील जाणार असून त्या साठी विशेष काळजी घेतली
 जाणार असल्याचे युवकांनी सांगितली आहे ह्या मध्ये जंगली झाडांचा मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाणार आहे त्या मध्ये वड, पिपरणी  ,जांभूळ , पिंपळ,आंबा ,लिंब अशा झाडांची लागवड केली जाणार आहे .
पहिल्या टप्प्यात प्राथमिक आरोग्य केंद्र कोळे येथे वृक्ष लागवडीस सुरुवात झाली .ह्या उपक्रमाला उस्फूर्तपणे गावातील लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.

गावातील तरुण एकत्र आल्याने गावचा विकासात नकीच भर पडेल व वृक्ष लागवडी मुळे पर्यावरण देखील चांगले राहील , वृक्षरोपण ही काळाची गरज आहे .
-प्रा.डॉ.सागर पाटील

*राज्यातील दुष्काळाबाबत सरकार निद्रिस्त अवस्थेत - पृथ्वीराज चव्हाण यांची टीका*

 *राज्यातील दुष्काळाबाबत सरकार निद्रिस्त अवस्थेत - पृथ्वीराज चव्हाण यांची टीका* 

 *कराड* : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महाराष्ट्र भीषण दुष्काळात होरपळत असून पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची प्रचंड मोठी टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायपीट होत आहे. चारा नसल्याने शेतकऱ्यांना जनावरे विकावी लागत आहेत. फळबागा करपून गेल्या आहेत. अनेक शहरांना 15 दिवसांनी पाणी मिळत आहे. एवढी भयंकर परिस्थिती असताना सरकार मात्र दुष्काळाबाबत निद्रिस्त अवस्थेत असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. दुष्काळाच्या परिस्थितीबाबत पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी आज आ. चव्हाण यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केली. या मीटिंग नंतर पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी समितीमधील सदस्य माजी मंत्री सतेज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. संजय जगताप, आ. विक्रमसिंह सावंत, आ. राजू आवळे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे, सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यावेळी उपस्थित होते. 

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विभागवार दुष्काळ पाहणी समिती स्थापन केली असून पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. या समितीमध्ये एकूण १३ सदस्य आहेत. हे सर्व सदस्य लोकप्रतिनिधी असून त्यांच्या जिल्ह्यातील दुष्काळाच्या परिस्थितीबाबत आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते त्यानुसार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंग संपन्न झाली. या मीटिंगमधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती सदस्यांनी दिली. सद्य स्थितीला प्रत्येकच जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ आचारसंहितेबाबत ठोस निर्णय घेऊन निवडणूक आयोगाला विनंती करून राज्यामधील दुष्काळी परिस्थितीची माहिती व्यवस्थित देऊन आचारसंहिता शिथिल करण्याबाबत प्रयत्न करावेत. 

येत्या दोन दिवसातच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यात समिती सदस्यांसोबत दौरा काढून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. याबाबत दौऱ्याचा आराखडा सुद्धा तयार करण्यावर या मिटिंगमध्ये चर्चा झाली. विरोधी पक्ष म्हणून दुष्काळाची दाहकता सरकारला अजून समजलेली दिसत नसल्याने वेळकाढू भूमिका घेतली जात असल्याचे दिसते. राज्यातील शेतकरी, तसेच त्यांची जनावरे पाण्याविना तडफडत आहेत. शेतीच्या पिकाला पाणी नाही, शेकडो गावामध्ये तसेच शहरामध्ये १५ दिवसातून पाणी येत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून तात्काळ उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी महाराष्ट्र काँग्रेस तत्पर असेल अशी माहिती आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्डसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन.

प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्डसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन.

तळमावले/वार्ताहर
विविध क्षेत्रात आदर्श असलेल्या आणि सामाजिक जडणघडणीसाठी उल्लेखनीय योगदान देत असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराश्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड या पुरस्काराने गौरवण्यात येते. या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे. समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामान्यांमधील आदर्श व्यक्ती, संस्था, ट्रस्ट यांना पुरस्काराने सन्मानित करुन त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. सदर पुरस्कार सोहळयाचे हे सहावे वर्ष आहे. याच कार्यक्रमात स्पंदन जीवन गौरव, दिवाळी अंक स्पर्धा, सेल्फी विथ गुढी स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा, राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक इत्यादींचाही सन्मान केला जाणार आहे.
डाकेवाडी सारख्या दुर्गम भागात राहूनही डाॅ.संदीप डाकवे आणि त्यांचे सहकारी यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. या कामाची दखल घेत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. याशिवाय माजी संभाजी शाहू छत्रपती, खा.डाॅ.अमोल कोल्हे, खा.श्रीनिवास पाटील, खा.उदयनराजे भोंसले, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, माजी अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अरविंद सावंत, माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड, आ.शिवेंद्रसिंहराजे भोंसले, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, अभिनेते किरण माने, कॅलिग्राफी आर्टीस्ट बाळासाहेब कचरे, अन्य मान्यवर यासह विविध सेलिब्रिटींनी शुभसंदेश देवून ट्रस्टच्या कार्याचा गौरव केला आहे.
तरी सदर पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्था, ट्रस्ट यांनी आपल्या नामांकनासह आपल्या क्षेत्रातील आपण केलेल्या कार्याचे फोटो, वृत्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे इ. साहित्याचे प्रस्ताव रविवार दि.31 जून, 2024 पर्यंत डाॅ.संदीप राजाराम डाकवे ‘राजनंदा प्राईड अपार्टमेंट’, फ्लॅट नं.8, होली फॅमिली काॅन्व्हेंट स्कुलच्या पाठीमागे, सैदापूर विद्यानगर, ता.कराड, जि.सातारा. 415124 येथे पोस्टाने अथवा कुरियरने पाठवावेत. आलेल्या नामांकनामधून निवड समितीने निवडलेल्या पुरस्कार्थींना एका भव्यदिव्य व शानदार कार्यक्रमात दिग्ग्ज मान्यवर, सेलिब्रिटी यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी डाॅ.संदीप डाकवे मो.9764061633 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रसिध्दीसाठी देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. 


स्पंदन पुरस्काराने विविध दिग्गजांचा सन्मान:
अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ खाडीलकर (भाऊ), पद्मश्री डाॅ.विजय शहा, खा.श्रीनिवास पाटील, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे यांना स्पंदन जीवन गौरव तर अभिनेते किरण माने, अभिनेत्री अश्विनी महांगडे, लावणीसम्राज्ञी विजया पालव, महाराष्ट्र केसरी पै.आप्पासाहेब कदम, शिवव्याख्याते प्रा.डाॅ.अरुण घोडके, अभिनेत्री प्राजक्ता शिसोदे, अभिनेते रवि साळुंखे, अभिनेता सुयश शिर्के, अभिनेत्री सुनंदा शेंडे, अभिनेत्री डाॅ.सीमा पाटील, अभिनेते व लेखक सचिन पाटील, अभिनेते प्रशांत बोधगीर, उद्योजक सर्जेराव यादव, ह.भ.प.विजय महाराज रामिष्टे, उद्योजक सुरेश रांजवण यांसह अनेक मान्यवरांना यापूर्वी राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...