शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

सातर गावचे विकासपुरुष माजी सरपंच रामचंद्र नानासो साळुंखे यांचे दुःखद निधन.

पाटण तालुक्यातील दुर्गम अशा सातर गावचे रहिवासी  रामचंद्र नानासो साळुंखे यांचे काल सकाळी तळमावले येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.रामचंद्र नानासो साळुंखे हे सातर ग्रामपंचायतिचे माजी सरपंच त्यांना गावातील लोक आदराने आण्णासाहेब म्हणायचे गेली ३५ वर्षे ते राष्ट्वादी काँग्रेस पक्ष पाटणकर गटाचे काम करत होते,अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी पक्ष सांभाळण्याचे काम गावात केले.

सातर गावात खरी विकासाची गंगा आणली ती आण्णासाहेबानी सातर या गावात विकासाचा पाया त्यांनीच रचला. गावात पाहिली आर सी सी ईमारत ऊभी राहीली ती त्यांच्याच मुळे. गावात प्रथम वीज आली ती यांच्या पाठपुराव्यामुळे, त्यांचा सामाजिक व राजकिय  क्षेत्रात अग्रगण्य सहभाग असायचा. गावात यात्रा भरवण्या पासुन ते अगदी गरिबतील गरिब लोकांची कामे त्यांनी पोटतिडकीने मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्न करायचे. आशा या गावातील थोर पुरुषाचे अल्पशा आजाराने  दुःखद निधन झाले.त्यांच्या जाण्याने सातर गावात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे....त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच परमेश्वराला प्रार्थना....
रक्षाविसर्जन उद्या रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 09.30 वाजता वैकुंठधाम तळमावले येथे होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...