मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

राष्ट्रवादी' पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे, निवडणूक आयोगाचा निर्णय.

राष्ट्रवादी' पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे, निवडणूक आयोगाचा निर्णय.


निवडणूक आयोगाकडून आज मोठा निर्णय देण्यात आला आहे. शरद पवार गटाला मोठा धक्का या निर्णयामुळे बसला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाला देण्यात आले आहे.गेले काही दिवसांपासून या निर्णयाची चर्चा होती. आज अखेर हा निर्णय निवडणूक आयोगाकडू जाहीर करण्यात आला आहे.

शरद पवार यांना मोठा धक्का 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निवडणूक आयोगाच्या निकालामुळे मोठा धक्का बसला आहे. पुतणे अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेत सत्ताधारी बाकांवर बसणं पसंत केलं होत. यानंतर हा वाद सुरु झाला होता. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिल्याने अजित पवार यांचा पुढील मार्ग आता सुकर झाला आहे. शरद पवार यांच्या अडचणींमध्ये मात्र मोठी वाढ झाली आहे.

बहुतांश आमदार अजित पवार यांच्या समर्थनार्थ

पक्षाचे बहुतांश आमदार हे अजित पवार यांच्या समर्थनात आहेत. शरद पवार यांनी देखील अजित पवार यांची भूमिका मान्य करत भाजपसोबत यावे अशी भूमिका या अजित पवार गटातील नेत्यांनी अनेकदा घेतली. याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चाही केली मात्र शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...