गुरुवार, २९ फेब्रुवारी, २०२४

माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा सुधारणा विधेयकावर पुनर्विचार करण्यासाठी विशेष समिती गठीत.

 माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा सुधारणा विधेयकावर पुनर्विचार करण्यासाठी विशेष समिती गठीत.



 मुंबई दि. २९ :- गेल्या तीन दिवसापासून मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या माथाडी कायदा बचाव कृती समितीचे आमरण व साखळी उपोषण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आज चौथ्या दिवशी स्थगित करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाची अधिवेशन चालू असतानाही मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा घडवून आणली. या शिष्टमंडळात विविध माथाडी कामगार संघटनेचे नेते उपस्थित होते या चर्चेतून माथाडी कामगार सुधारणा विधेयकांवर पुनर्विचार करण्यासाठी एक सर्वसाधारण समिती व ११ सदस्यांची कृती समिती गठित करण्यात आली. यामध्ये शासनाच्या कामगार, नगर विकास, पणन, गृह खात्याचे सचिव विविध माथाडी कामगार नेत्यांचा समावेश असून या समितीने तीन महिन्यांच्या आत माथाडी कायदा सुधारणा विधेयकावर चर्चा चौकशी करून तीन महिन्यांच्या कालावधीत शासनाला प्रस्ताव सादर करावा. तोपर्यंत माथाडी कायदा सुधारणा विधेयकातील सुधारणा प्रलंबित ठेवण्यात येतील असाही निर्णय घेण्यात आला व त्या निर्णयाचे लेखी पत्र मंत्री महोदय दादा भुसे यांनी आझाद मैदानातील माथाडी कामगारांच्या उपोषणा स्थळी ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांच्या हाती सुपुर्द केले व दादा भुसे यांच्या हस्ते बाबा आढाव यांना ज्युस पाजून उपोषण थांबविले. कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी वेगाने हालचाल करून शासन आणि माथाडी कायदा बचाव कृती समितीमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी अथक मेहनत घेतली, तर आमदार शशिकांत शिंदे यांनी माथाडी कायद्यातील सुधारणा विधेयकावर विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशा झालेली चचा व निर्णयाची माहिती आंदोलनकांना दिली. उपोषणाच्या शेवटी बोलताना बाबा आढाव म्हणाले की, या तीन महिन्यांच्या अवधीत माथाडी मंडळांचा घसरलेला कारभार सुधारला पाहिजे, माथाडीच्या कार्यक्षेत्रात गुंडगिरी करणाऱ्या खंडणीखोरांचा बंदोबस्त झाला पाहिजे, आमच्यातले जर कोणी गुंडगिरी करत असतील तर आम्ही त्यांचा बंदोबस्त करू. स्वच्छ कारभाराने लोकांना न्याय दिसला पाहिजे असे ते म्हणाले व नरेंद्र पाटील आणि माथाडी नेते व कामगार यांनी गेले चार दिवसापासून उपोषणाला पोलीस यंत्रणा, मिडीया, वृत्त प्रतिनिधी, माथाडी कामगार यांनी दिलेला प्रतिसाद आणि उपोषण स्थळी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सर्व नेत्यांचे आभार मानले.



जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप.


 


तळमावले/वार्ताहर
    सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी डाॅ.संदीप डाकवे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत गौरव केला. डाॅ.डाकवे यांना शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल किसान उत्सव दिनाचे औचित्य साधत शाल, श्रीफळ, आंब्याचे रोपटे आणि कोल्हापूर फेटा देवून सन्मान केला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासमवेत यावेळी सातारा जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे व अन्य कृषी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा जिल्हा कृषी विभागाच्या वतीने या कौतुक सोहळयाचे आयोजन केले होते.


    पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा कृषी विभागाचा पत्रकारितेचा सर्वोच्च वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांनी हा गौरव केला.


    दरम्यान, डाॅ.संदीप डाकवे यांनी स्वतः रेखाटलेले कलेक्टर जितेंद्र डुडी यांचे चित्र त्यांना भेट दिले. या ‘सरप्राईज’ भेटीमुळे कलेक्टर साहेब खुष झाले. त्यांनी डाॅ.संदीप यांच्या पत्रकारितेबरोबर कला कौशल्याचेही कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डाॅ.डाकवे यांच्यासमवेत सौ.रेश्मा डाकवे, कु.सांची डाकवे तसेच विविध कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, कृषी कर्मचारी उपस्थित होते.
लवकरच शेतीमित्र पुरस्काराचे वितरण शासनाच्या वतीने मुख्यमंत्री, राज्यपाल, कृषीमंत्री आणि अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक केले जाणार आहे.


मुख्यमंत्र्यांच्या बनावट सही, शिक्क्याप्रकरणी कोणालाही पाठिशी घालणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.

 

 


मुंबई, दि. २९ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरु आहे. याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसेभत दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आढळून आले आहे. ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे राज्य सरकारने त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे  उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.

बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

असंघटित कामगारांनी मोठ्या प्रमाणात ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे.

 असंघटित कामगारांनी मोठ्या प्रमाणात ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे.         

 


 

 

मुंबई, दि. 28 : टेलरिंग व्यवसायातील अल्प उत्पन्न, कमी शिक्षीत अशा कारागीरांना संघटीत करणे गरजेचे आहे. टेलरिंग व्यवसायातील कामगारांनी मोठ्या संख्येने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. नोंदणी वाढविण्यासाठी शासनामार्फत शिबिराचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.

असंघटित टेलरिंग कामगारांच्या समस्यांबाबत नरिमन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार प्रकाश आबिटकर, प्रधान सचिव  विनिता वेद सिंगल, आयुक्त डॉ. एच. पी. तुंबोरे आदिसह संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री खाडे म्हणाले की, असंघटित कामगारांना संघटित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू असून, जास्तीत – जास्त  कामगारांनी येथे नोंदणी करावी. टेलरिंग व्यावसायिकांना संघटित करून त्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. राज्यभरात आतापर्यंत अंदाजे दोन कोटी पेक्षा जास्त कामगारांची नोंदणी झाली असून, त्यांना प्रशिक्षण, व्यवसायासाठी साहित्य, आर्थिक लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. इतर कामगारांप्रमाणे टेलरिंग कामगारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी श्री. खाडे यांनी केले.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात श्री. वाल्मीकी विद्यामंदिराने मिळविला द्वितीय क्रमांक.

 

                                                  साप्ताहिक वृत्तपत्र

कुमजाई पर्व

                                                                                                आवाज जनसामान्यांचा.......


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात श्री. वाल्मीकी विद्यामंदिराने मिळविला द्वितीय क्रमांक. 

 

तळमावले, दि. 27 : राज्यातील शैक्षणिक विभागातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात येणारे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय निकालांची घोषणा नुकतीच करण्यात आली. या अभियानांतर्गत शाळा व परिसराचे साैंदर्यीकरण, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम आदींची तपासणी तज्ज्ञ समितीच्यावतीने करण्यात आली होती.


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियाना- अंतर्गत खाजगी व्यवस्थापन शाळा गटामध्ये पाटण तालुक्यातील तीन व शासकीय शाळांच्या गटातून जिल्हा परिषदेच्या तीन शाळांनी तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. 

खाजगी व्यवस्थापन गटात पाटण येथील सौ. सुलोचनाबाई पाटणकर कन्याशाळा, पाटणने प्रथम क्रमांक, तळमावले येथील श्री वाल्मीकी विद्यामंदिराने द्वितीय व चाफळ येथील श्री समर्थ विद्यामंदिराने तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय शासकीय शाळांच्या गटातून जि. प. शाळा, वेखंडवाडीने प्रथम, जि. प. शाळा, ढोरोशीने द्वितीय व जि. प. शाळा, चव्हाणवाडीने तृतीय क्रमांक पटकावला. शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास असे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत घटक होते. 

या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...