डाॅ.संदीप डाकवे यांना ऑल जर्नालिस्ट अँण्ड फ्रेंड्स सर्कलचा प्रेरणा पुरस्कार जाहीर.
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना ऑल जर्नालिस्ट अँण्ड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी डॉ. डाकवे यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी महाराष्ट्र शासनाचे 5 पुरस्कार मिळाले आहेत. नांदेड येथील नरहर कुरुंदकर सभागृह पिपल्स काॅलेज नांदेड येथे रविवार दि.24 डिसेंबर, 2023 रोजी होणाऱ्या 18 व्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात हा पुरस्कार डाॅ.संदीप डाकवे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
डाॅ.डाकवे यांच्या नावाची नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड, हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड, इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड, द ग्रेटेस्ट इंडियन या पुस्तकात झाली आहे
डाॅ.संदीप डाकवे यांनी पत्रकारितेसोबत 60 च्यावरती विविध पुस्तके, मासिके, दिवाळी अंक, नियतकालिके, अहवाल, स्मरणिका इ.ची कल्पक मुखपृष्ठ साकारली आहेत. याशिवाय त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासताना गरजूंना सुमारे एक लाखापेक्षा जास्त रकमेची रोख आर्थिक मदत केली आहे.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा