मंगळवार, ३० मे, २०२३

राजधानी साताऱा येथे ‘महाराष्ट्र सन्मान’ पुरस्काराचे दिमाखात वितरण खा.श्रीनिवास पाटील,आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले,राजा माने यांची उपस्थिती

 राजधानी साताऱा येथे ‘महाराष्ट्र सन्मान’ पुरस्काराचे दिमाखात वितरण

 खा.श्रीनिवास पाटील,आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले,राजा माने यांची उपस्थिती

 
राजधानी सातारा येथे महाराष्ट्र लाईव्ह न्युज चॅनल च्यावतीने   ‘महाराष्ट्र सन्मान २०२३’ या दिमाखदार सोहळा संपन्न झाला ,या सन्मान सोहळ्यासाठी सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व वरिष्ठ संपादक माध्यम तज्ञ व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, भाजपा नेते मनोज दादा घोरपडे , कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे उपस्थित होते. यावेळी सातारा, सांगली, कोल्हापूर,सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक ,साहित्यिक ,सांस्कृतिक ,कला ,क्रीडा ,शैक्षणिक,पत्रकारिता क्षेत्रातील १४ मान्यवरांचा सन्मान करण्यात आला
यावेळी यशवंत संभाजीराव पाटणे
(प्रतिभावंत लेखक व व्याख्याते,डॉ. राजेंद्र नानासो सरकाळे
(मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा), हिंदुराव शंकरराव पाटील
(माजी कृषी सभापती, जिल्हा परिषद सातारा),विकास दिलीपराव थोरात  ,रेल्वे लढयाचे प्रवर्तक
(तारगांव, ता. कोरेगांव जि सातारा,श्रीमती संघमित्रा भिमराव  ढापरे,
सेवानिवृत्त मुख्यादयापिका
(मु.पो.कापील ता कराड जि सातारा),मंगेश सुभाष पाटील,कोल्हापूर
(उपकार्यकारी अभियंता,  ), कु. मोहित संतोष जगताप
अथलॅटिक्स खेळाडू
(निगडी ता.कोरेगांव जि सातारा),अजित सिताराम सांडगे
उद्योजक,कराड (आगाशिवनगर, कराड जि. सातारा),राजू सर्जेराव शेळके
(जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना,सातारा) जावळवाडी पो. वेणेगाव, ता.जि. सातारा, मारुती शिवराम मोळावडे,सदस्य, सातारा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) मु.मोळावडेवाडी, पो.कुठरे, ता.पाटण जि.सातारा,ह.भ.प. डॉ. सुहास नथुराम फडतरे महाराज
(कुमठे, ता.कोरेगांव जि.सातारा),उमेश हिंदुराव बांबरे
दैनिक सकाळ सह मुख्य बातमीदार
(मु पो भरतगांववाडी ता जि सातारा), सुहास जगन्नाथ माने(कृषी)
मु.पो. राहुडे, ता.पाटण जि. सातारा,ओंकार तानाजी डांगे
उपकार्यकारी अभियंता यांना महाराष्ट्र सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या जडणघडणीत सातारा जिल्ह्याचे योगदान खूप मोलाचे असून या सातारा जिल्ह्यातील कर्तृत्ववान १४ हिऱ्यांचा होणारा सत्कार म्हणजे राजधानी सातारा साठी गौरवशाली बाब आहे आपल्या सातारा जिल्ह्याचे नाव जगाच्या पातळीवर पोहोचवण्यासाठी आजच्या तरुण पिढीने पुढाकार घ्यावा यासाठी सर्वतोपरी आमचे सहकार्य राहील.
महाराष्ट्र सन्मान २०२३ पुरस्काराने सन्मानित झालेले १४ हिरे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील आयडॉल असून आपापल्या क्षेत्रात उच्च कामगिरी करणारे व्यक्तिमत्व आहे राजधानी सातारा मध्ये महाराष्ट्र सन्मान सोहळा होत असून ही परंपरा कायम राहावी यासाठी सर्वतोपरी सहकार्य सर्वांचे असेल असा विश्वास सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला.
वरिष्ठ संपादक व माध्यम तज्ञ राजा माने यावेळी म्हणाले देशभरात बदलत्या तंत्रज्ञानामुळे मीडिया क्षेत्रात देखील मोठा बदल झाला असून डिजिटल मीडिया आता नवी झेप घेत आहे या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून नव्या दिशा देखील समाजाला मिळत आहेत राजधानी साताऱ्याचा इतिहास जगासमोर मांडण्याचे काम डिजिटल मीडिया नक्की करेल व तरुण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कारासारखे विविध उपक्रम राबवावेत
यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मनोजदादा, घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य हिंदुराव पाटील ,प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, डाॅ.राजेंद्र सरकाळे, यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र लाईव्ह न्युज चॅनलचे संपादक विकास भोसले यांनी केले, सूत्रसंचालन वसुंधरा खांडके यांनी केले तर आभार प्रतिक भोसले यांनी मानले.


शनिवार, २७ मे, २०२३

मला कुणाचं येन नाही मि कुणाचं देणं नाही.मी अनुभवलेले डॉ केतकर काका


मला कुणाचं येन नाही मि कुणाचं देणं नाही.मी अनुभवलेले डॉ केतकर काका 

मी डॉक्टर नितीन बेलागडे  ढेबेवाडी येथे डॉ  केतकर काका यांच्या दवाखान्या शेजारी माझे घर आहे त्यामुळे मी लहानपणापासून डॉक्टर काकांना जवळून पहात मोठा झालो.मी त्यांच्या सोबत पाच वर्षे काम केले आहे.

आणि  आज मीही डॉक्टर झालो तो त्यांच्या मार्गदर्शनामुळे डॉक्टर केतकर काकांची जनमानसात वेगळी ओळख होती.त्यांनी पैशाचा हिशोब कधीच केला नाही.मला आठवतय 2005 साली फक्त 20 रुपये रुग्णांना कडुन घेत सेवा देत होते. ते ही कोणी दिलं कोणी नाही अशी स्थिती मि त्यांना म्हणायचो काका हे पैसे देत नाहीत त्याचे एकच उत्तर जाऊदे.
एक दिवस संध्याकाळी मि लिहून ठेवलेली उधारी त्यांना दाखवली किंबहुना डॉ केतकर काकांना ते माहीत नव्हते 
मी त्यांना डायरी दाखवली त्यांनी पाहिली आणि त्यांचे डोळे लाल झाले कडा पानवल्या होत्या
डायरीत लिहलेले उदारीची पानं काकांनी टराटरा फाडली आणि एक वाक्य तोडांतुन आलं 
मला कुणाचं येन नाही मि कुणाचं देणं नाही.

ते मला एक गोष्ट कायम सांगत आपली  भागातील लोक खूप गरीब आहेत काही डाॅक्टर कसाई आहेत लोकांना लुबडतात मला त्यांच्या साठी काम करायचे आहे हे सगळं माझं कुटुंब आहे.हे डॉक्टर केतकराचे विशाल पण होतं.त्यावेळी परस्थिती पण तशी होती.

अजुन एक अनुभव मला सांगावसा  वाटतो.
2003 ची ती गोष्ट आहे रात्री नऊ ची वेळ तामिने गावातील एक 60 ते 65 वर्षाचा तो माणूस पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात आला 
 दवाखान्या जवळ माझे घर असल्यामुळे आणि डॉक्टर केतकर काका माझ्या घरी सोबत जेवण करत होतो
 आम्ही पटकन जेवण आवरुन दवाखान्यात गेलो त्या माणसाच्या खुप पोटात दुखत होते
डॉ केतकर काकांनी फक्त पोटावर हात ठेवला.मी समोर उभा होतो आणि पहात होतो
 त्यांनी पोटावर हात ठेवून तपासल्या नंतर पटकन सांगुन टाकले कि तुझ्या आतड्याला होल पडलंय पटकन कराडमध्ये ऑफरेशन साठी जा त्याला वाटलं  हा काय सांगतोय म्हणुन ते  एका हाॅस्पिटलमध्ये गेला तिथं सर्व तपासण्या झाल्या वर तेचं सांगितले आतड्याला होल आहे.त्या वेळी मला कळले डॉक्टर केतकर म्हणजे एक वेगळं रसायन आहे
आता सर्व तपासण्या केल्यानंतर निदान होते पण डॉ केतकर यांच्या दवाखान्यात कोणत्याही मिशनरी शिवाय निदान होतं होते याचा मी साक्षीदार आहे.
हो खरंच गरीबांचा देव माणूस
अशा ह्या  देव माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली
लेखक - डॉक्टर नीतीन बेलागडे ( पशुसेवक )

शुक्रवार, २६ मे, २०२३

कराड : शासकीय तंत्रनिकेतन, कराड दोन अभ्यासक्रमांना एनबीए मानांकन

 

शासकीय तंत्रनिकेतन, कराड दोन अभ्यासक्रमांना एनबीए मानांकन


 

 

कराड, दि.26: शासकीय तंत्रनिकेतन, कराड मधील विद्युत अभियांत्रिकी व संगणक अभियांत्रिकी या दोन पदविका अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून ३ वर्षांसाठी मानांकन प्राप्त झाले.

दि.२८ ते ३० एप्रिल या कालावधीत नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या त्रिसदस्यीय समितीकडून संस्थेला भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची शैक्षणिक आकलनातील प्रगती, निकालातील सातत्य, महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, करियर गाईडन्स, प्लेसमेंट, पालक आणि माजी विद्यार्थ्यांचे संस्थेबद्दलचे मत अशा विविध मुद्यांवर समितीने पाहणी केली होती.

शासकीय तंत्रनिकेतन, कराड या राज्याच्या ग्रामीण भागातील पदविका अभियांत्रिकी संस्थेस एन.बी.ए. मानांकन मिळणे हा मोठा बहुमान आहे. संस्थेने गुणवत्तापूर्ण, सामाजिक जाण असलेले कुशल अभियंते घडविण्यासाठी आजवर घेतलेल्या कष्टाची ही पोच पावती आहे. आता एआयसीटीई च्या विविध योजना - अर्थ सहाय्य, संस्थेचे भविष्यातील विकासाच्या योजना ही संस्था नवीन जोमाने पूर्ण करेल, असा विश्वास संस्थेचे प्राचार्य डॉ.राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.

गुरुवार, २५ मे, २०२३

भित्ती चित्र काव्य प्रदर्शनासाठी वडील या विषयावर कविता पाठवण्याचे आवाहन

 भित्ती चित्र काव्य प्रदर्शनासाठी वडील या विषयावर कविता पाठवण्याचे आवाहन


 


तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने भित्ती चित्र काव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. वास्तविक पाहता वडिलांविषयी फारसं कोणी लिहीत नाही, बोलत नाही. म्हणून या भावना एकत्र करण्यासाठी या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.


या उपक्रमासाठी कविंनी वडील या विषयावरील दोन स्वरचित कविता पाठवाव्यात. कवितेसोबत कविचे पूर्ण नांव, पत्ता, आयडेंटी फोटो, जास्तीत जास्त 5 ओळींमध्ये स्वतःबद्दलची माहिती पाठवावी. निवड समितीच्या माध्यमातून या कवितांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक कविला आकर्षक सन्मानपत्र आणि पुस्तक देण्यात येणार आहे. तसेच प्राप्त झालेल्या कवितांची सुंदर कॅलिग्राफी व आकर्षक डिझाईन करुन त्याची मोठया आकारातील रंगीत प्रिंट काढून त्याचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. या उपक्रमासाठी कवितांची संख्या वाढल्यास त्याचे पुस्तक करण्याचा मानस संयोजकांनी व्यक्त केला आहे.
साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी यापूर्वी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिवाळी अंक स्पर्धा, वार्तांकन स्पर्धा, साहित्य पुरस्कार, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, ग्रंथतुला, पुस्तक प्रकाशन आद विविध उपक्रम राबवले आहेत.


तरी या उपक्रमांसाठी कविंनी आपल्या किमान 30 ओळीपर्यंतच्या 2 कविता 9764061633.या क्रमांकावर व्हाॅटसअप किंवा sandeepdakve@gmail.com या ईमेल पाठवाव्यात अथवा सोमवार दि.31 जुलै, 2023 पर्यंत ‘राजनंदा प्राईड अपार्टमेंट’, फ्लॅट नं.8, होली फॅमिली काॅन्व्हेंट स्कुलच्या पाठीमागे, सैदापूर विद्यानगर, ता.कराड, जि.सातारा. 415124 येथे पोस्टाने पाठवाव्यात असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष डॉ.संदीप डाकवे यांनी केले आहे.

बुधवार, २४ मे, २०२३

काळगांव : डाकेवाडीच्या अमृताने खाकी वर्दीचं स्वप्न सत्यात उतरवलं

 डाकेवाडीच्या अमृताने खाकी वर्दीचं स्वप्न सत्यात उतरवलं

 


तळमावले/वार्ताहर
जिद्द, चिकाटी, योग्य नियोजन आणि इच्छाशक्ती असेल तर डोंगराएवढया संकटांना भेदून यशाला गवसणी घालणे शक्य होते. आपल्या अंगावर खाकी वर्दी असावी असं स्वप्न अमृता डाकवेने काॅलेजला असताना पाहिलं आणि ते पूर्ण देखील केले. या तरुणीने मिळवलेले यश कौतुकास पात्र असेच आहे. कारण घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना तिने अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर पोलीस भरतीमध्ये यश मिळवत खाकी वर्दीचं स्वप्न तिने सत्यात उतरवलं आहे.


डाकेवाडी (काळगांव) येथील अमृता तानाजी डाकवे यांनी मुंबई पोलीस भरतीमध्ये प्रतिकूल परिस्थितीत अविश्रांत अभ्यास करत यश संपादन केले. घरातील आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेल्या अमृता हिची आई सौ.अलका आणि वडील तानाजी शेतीची कामे करत अमृताच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले. शेतामध्ये कष्ट करत या दोघांनी त्यांच्या कुटूंबाचा उदरर्विाह केला आहे. त्याचबरोबर दोघांनी अमृताला मानसिक आणि आर्थिक पाठबळ दिले. अमृतानेही आपल्या आईवाडीलांच्या प्रामाणिक कष्टाची जाणीव ठेवत अभ्यास व सराव केला त्यांना घरच्या कामात मदत केली आणि पोलीस भरतीमध्ये यश मिळवले.


या यशाबद्दल स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने डाॅ.संदीप डाकवे, सौ.रेश्मा डाकवे, गयाबाई डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे, स्पंदन डाकवे यांनी अमृताचा तिच्या आईवडिलांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ आणि पुस्तक देवून सत्कार केला. सत्काराप्रसंगी अमृताच्या आईवडीलांचे डोळे आनंदाश्रूनी भरले होते.
प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवल्याबद्दल विविध स्तरांतून अमृताचे अभिनंदन होत आहे. काबाडकष्ट करुन पोलीस भरतीमध्ये यश मिळवणे हे नक्कीच या क्षेत्रात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत अशी आहे.

मंगळवार, २३ मे, २०२३

काळगांव : डाकेवाडीतील कु.राधिका मस्करला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळाली 75 हजाराची मदत

काळगांव : डाकेवाडीतील कु.राधिका मस्करला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळाली 75 हजाराची मदत



तळमावले/वार्ताहर
कु.राधिका शिवाजी मस्कर या मुलीस मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 75 हजाराची मदत मिळाली आहे. या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कक्षाकडे डाॅ.संदीप डाकवे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी यशस्वी पाठपुरावा केला. नुकताच राधिका मस्कर या रुग्णाला डिस्चार्ज मिळाला असून तिची तब्बेत चांगली आहे.
पाटण तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या डाकेवाडी (काळगांव) या वाडीतील 6 वर्षाची कु.राधिका ही सकाळी शाळेला जायची तयारी करत होती. घरात लाईट नसल्यामुळे दिवा लावून केस विंचरत असताना अचानक दिव्याची ज्योत फ्राॅकला लागली आणि हा हा म्हणता नायलाॅन फ्राॅक ने पेट घेतल्यामुळे ती भाजली गेली. 6 वर्षाची असताना प्रथमोपचार करुन तिला बरे केले होतेे. परंतू वाढत्या वयामुळे तिला उठणे, बसणे, चालणे मुस्कील होत होते. वडील शिवाजी मस्कर व आई आशा मस्कर यांनी राधिकाला हाॅस्पिटल मध्ये तपासणीसाठी नेल्यानंतर तिची प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला. या ऑपरेशनसाठी खर्च मोठा होता. सदर उपचार महात्मा फुले जीवनदायी योजना मध्ये बसत नाही तसेच अन्य कोणाकडून यासाठी मदत झाली नाही. दि.23 एप्रिल, 2023 रोजी कु.राधिका ला ऍडमिट केले. कृष्णा हाॅस्पिटलचे सर्जरी तज्ञ डाॅ.चिन्मय विंगकर यांनी राधिकाची प्लाॅस्टीक सर्जरी यशस्वी केली. 23 मे, 2023 ला राधिका डिस्चार्ज मिळाला. डाॅ.संदीप डाकवे, सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षप्रमुख मंगेश चिवटे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी सहाय्यक रविंद्र ननावरे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी सहाय्यक करमाळे रोहित वायभासे यांच्याशी संपर्क साधून निधी मिळवण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला.
डाकेवाडीतील मस्कर परिवाराने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले आहेत.


रविवार, २१ मे, २०२३

श्रीमती खाशीबाई शंकर सावंत यांचे दुःखद निधन

निधन वार्ता
 श्रीमती खाशीबाई शंकर सावंत यांचे दुःखद निधन
 श्री दत्त विकास मंडळ धामणी गावचे अध्यक्ष बाबुराव शंकर सावंत यांच्या मातोश्री खाशीबाई शंकर सावंत यांचे आज रविवार दि.21 रोजी वयाच्या 100 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले.
रक्षा विसर्जन मंगळवार दिनांक 23 रोजी  वैकुंठधाम धामणी येथे सकाळी 09:30 वाजता होणार आहे.

  खाशीबाई शंकर सावंत खूप मनमिळावू स्वभावाच्या होत्या  गावात आक्का या नावाने परिचित होत्या त्यांच्या मागे मुले, मुली, सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे.

शनिवार, २० मे, २०२३

सातारा : नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

सातारा : नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 


 

  सातारा दि. 19 : सातारा जिल्ह्यातील ज्या नागरिकांची आधार कार्ड तयार होऊन दहा वर्ष पूर्ण झाली आहेत अशा नागरिकांनी आपल्या आधार अद्ययावत करून घेणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी आधार विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

 सातारा जिल्ह्यामध्ये आधार अद्ययावतीकरण करण्याची मोहिम वेगवान करण्यासाठी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, विशेष कार्यकारी दंडाधिकारी याबाबत वेळोवेळी आढावा घेत आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत वितरीत केलेल्या 93 आणि महिला व बालविकास विभागाच्या 56 आधार केंद्र चालकांचा आढावा घेण्यात आला असून त्यांना शिबिरांचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने त्यामध्ये अनेक बदल होतात जसे पत्ता, नागरिकांचे बोटांची ठसे, नावामध्ये दुरुस्त्या, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इ. भारतीय विशेष ओळख प्राधिकरण (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया-- युआयडीएआय) यांनी अपडेट डॉक्युमेंट नावाची नवीन सुविधा तयार केली असून माय आधार या अॅपवर अथवा www.myaadhar.uidai.gov.in या संकेत स्थळावर जाऊनही आधार डॉक्युमेंट अपडेट करू शकतात.कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावरही माहिती अद्ययावत करता येते.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजना, पुरवठा विभागाच्या शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या विविध सेवा, पीएम किसान, जीवन प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती, सामाजिक लाभाच्या विविध योजना इत्यादी व अशा अनेक शासकीय योजनांसाठी आधार अद्ययावत असणे बंधनकारक आहे.

            UIDAI ने टोल फ्री नंबर देखील जारी केला आहे, नागरिकांना आधारशी संबंधित काही समस्या असल्यास, हेल्पलाइन नंबर 1947 वर कॉल करू शकता. नागरिकांना आधार शिबिरांचे आयोजन करावयाचे असल्यास आधार संकलन , जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे संपर्क साधावा.

तरी सर्व नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

 

शुक्रवार, १९ मे, २०२३

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत पुरस्काराने डाॅ.संदीप डाकवे सन्मानित

  

 


तळमावले/वार्ताहर
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य (कार्यक्षेत्र ऑल इंडिया) सातारा जिल्हा व चंद्रभागा रुरल डेव्हलपर यांच्या वतीने डाॅ.संदीप डाकवे यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
व्यसनमुक्ती या एकाच विषयावर एकाच दैनिकात एका वर्षात पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी जास्तीत जास्त लेख लिहून ते प्रसिध्द केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. सुप्रसिध्द अभिनेत्री सुरेखा कुडची, बिग बाॅस फेम तृप्ती देसाई, रुरल डेव्हलपरचे दिपक लोखंडे, महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, काॅंग्रेसचे युवा नेते इंद्रजित चव्हाण, अभिनेत्री सुनंदा शेंडे, अपर्णा लोखंडे, सुदर्शना थोरवडे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संघटक पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.


दरम्यान डाॅ.संदीप डाकवे यांनी यावेळी सुरेखा कुडची यांना त्यांचे स्केच तर तृप्ती देसाई, दीपक लोखंडे यांना त्यांच्या नावाचा अक्षरगणेशा भेट दिला.
पत्रकारिता, कला आणि स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून डाॅ.संदीप डाकवे यांनी शेकडो नावीण्यापूर्ण उपक्रम राबवले आहेत.
डाॅ.संदीप डाकवे यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

मंगळवार, ९ मे, २०२३

बोगस खते पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठवावा – पालकमंत्री शंभुराज देसाई

बोगस खते पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठवावा – पालकमंत्री शंभुराज देसाई

 

बोगस खते पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठवावा – पालकमंत्री शंभुराज देसाई


सातारा दि. 6: एखाद्या कंपनीच्या खताचे नमुने सलग दोन-तीन वर्ष बोगस आढळल्यास अशा कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे खरीप हंगाम आढावा बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.  या बैठकीस आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सुरुवातीस सन 2022-23 मध्ये कृषि विभागाने केलेले काम तसेच 2023-24 मध्ये खते, बियाणे यांची उपलब्धता व पुरवठा यासह कृषि विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, भाग्यश्री फरांदे यांनी दिली.

शेतकऱ्यांनी सोयाबीनचे स्वत:कडील बियाणे वापरणे फायदेशीर असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात खतांचा व बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्याचा शेतकऱ्यांना वेळेत पुरवठा करावा.  लिंकींग पध्दतीने खत विक्री होत असल्यास त्यावर कारवाई करण्यात यावी.  त्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढवावी.  कृषि पंपाना विद्युत जोडण्या देण्याचे काम जिल्ह्यात चांगल्या पध्दतीने सुरु आहे.  उर्वरित विद्युत जोडण्यांसाठी लागणारा अधिकचा निधी देऊन तेही काम लवकर पूर्ण केले जाईल. राष्ट्रीयकृत तसेच खाजगी बँकांनी कृषि पतपुरवठ्याला प्राधान्य द्यावे.  कोणत्याही परिस्थितीत कर्ज नाकारायचे नाही. कृषि पतपुरवठ्याचे उद्दीष्ट वाढविण्यात यावे व उद्दीष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांवर कारवाई करावी.   एक रुपयांत पीक विमा योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करा. जिल्ह्यात शंभर टक्के शेतकरी पीक विमा उतरवतील असे पहा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

 

सौर पार्क योजनेत सहभागाचे आवाहन

वीजेची उपलब्धता वाढवून ग्रामीण भागात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त वीज उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने सौर पार्क योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पडीक जमीन तसेच ज्या ठिकाणी कोणतेही पीक घेतले जात नाही,अशा जमिनीवर सौर पार्क उभारण्यात येणार आहे.  यासाठी सदर जमिनीचे शासनाने ठरविल्याप्रमाणे भाडेही संबंधित जमीन मालकांना देण्यात येईल. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल, ग्रामविकास, कृषि व महावितरण या यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच  या योजनेच्या माध्यमातून पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना उत्पन्न घेण्याची संधी मिळणार आहे.  तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते प्रगतीशील शेतकरी यशोगाथाचे प्रकाशन करण्यात आले.

 

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...