गुरुवार, २५ मे, २०२३

भित्ती चित्र काव्य प्रदर्शनासाठी वडील या विषयावर कविता पाठवण्याचे आवाहन

 भित्ती चित्र काव्य प्रदर्शनासाठी वडील या विषयावर कविता पाठवण्याचे आवाहन


 


तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने भित्ती चित्र काव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. वास्तविक पाहता वडिलांविषयी फारसं कोणी लिहीत नाही, बोलत नाही. म्हणून या भावना एकत्र करण्यासाठी या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.


या उपक्रमासाठी कविंनी वडील या विषयावरील दोन स्वरचित कविता पाठवाव्यात. कवितेसोबत कविचे पूर्ण नांव, पत्ता, आयडेंटी फोटो, जास्तीत जास्त 5 ओळींमध्ये स्वतःबद्दलची माहिती पाठवावी. निवड समितीच्या माध्यमातून या कवितांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक कविला आकर्षक सन्मानपत्र आणि पुस्तक देण्यात येणार आहे. तसेच प्राप्त झालेल्या कवितांची सुंदर कॅलिग्राफी व आकर्षक डिझाईन करुन त्याची मोठया आकारातील रंगीत प्रिंट काढून त्याचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. या उपक्रमासाठी कवितांची संख्या वाढल्यास त्याचे पुस्तक करण्याचा मानस संयोजकांनी व्यक्त केला आहे.
साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी यापूर्वी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिवाळी अंक स्पर्धा, वार्तांकन स्पर्धा, साहित्य पुरस्कार, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, ग्रंथतुला, पुस्तक प्रकाशन आद विविध उपक्रम राबवले आहेत.


तरी या उपक्रमांसाठी कविंनी आपल्या किमान 30 ओळीपर्यंतच्या 2 कविता 9764061633.या क्रमांकावर व्हाॅटसअप किंवा sandeepdakve@gmail.com या ईमेल पाठवाव्यात अथवा सोमवार दि.31 जुलै, 2023 पर्यंत ‘राजनंदा प्राईड अपार्टमेंट’, फ्लॅट नं.8, होली फॅमिली काॅन्व्हेंट स्कुलच्या पाठीमागे, सैदापूर विद्यानगर, ता.कराड, जि.सातारा. 415124 येथे पोस्टाने पाठवाव्यात असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष डॉ.संदीप डाकवे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...