शासकीय तंत्रनिकेतन, कराड दोन अभ्यासक्रमांना एनबीए मानांकन
कराड, दि.26: शासकीय तंत्रनिकेतन, कराड मधील विद्युत अभियांत्रिकी व संगणक अभियांत्रिकी या दोन पदविका अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून ३ वर्षांसाठी मानांकन प्राप्त झाले.
दि.२८ ते ३० एप्रिल या कालावधीत नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या त्रिसदस्यीय समितीकडून संस्थेला भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची शैक्षणिक आकलनातील प्रगती, निकालातील सातत्य, महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, करियर गाईडन्स, प्लेसमेंट, पालक आणि माजी विद्यार्थ्यांचे संस्थेबद्दलचे मत अशा विविध मुद्यांवर समितीने पाहणी केली होती.
शासकीय तंत्रनिकेतन, कराड या राज्याच्या ग्रामीण भागातील पदविका अभियांत्रिकी संस्थेस एन.बी.ए. मानांकन मिळणे हा मोठा बहुमान आहे. संस्थेने गुणवत्तापूर्ण, सामाजिक जाण असलेले कुशल अभियंते घडविण्यासाठी आजवर घेतलेल्या कष्टाची ही पोच पावती आहे. आता एआयसीटीई च्या विविध योजना - अर्थ सहाय्य, संस्थेचे भविष्यातील विकासाच्या योजना ही संस्था नवीन जोमाने पूर्ण करेल, असा विश्वास संस्थेचे प्राचार्य डॉ.राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा