मंगळवार, २३ मे, २०२३

काळगांव : डाकेवाडीतील कु.राधिका मस्करला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळाली 75 हजाराची मदत

काळगांव : डाकेवाडीतील कु.राधिका मस्करला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळाली 75 हजाराची मदत



तळमावले/वार्ताहर
कु.राधिका शिवाजी मस्कर या मुलीस मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 75 हजाराची मदत मिळाली आहे. या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कक्षाकडे डाॅ.संदीप डाकवे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी यशस्वी पाठपुरावा केला. नुकताच राधिका मस्कर या रुग्णाला डिस्चार्ज मिळाला असून तिची तब्बेत चांगली आहे.
पाटण तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या डाकेवाडी (काळगांव) या वाडीतील 6 वर्षाची कु.राधिका ही सकाळी शाळेला जायची तयारी करत होती. घरात लाईट नसल्यामुळे दिवा लावून केस विंचरत असताना अचानक दिव्याची ज्योत फ्राॅकला लागली आणि हा हा म्हणता नायलाॅन फ्राॅक ने पेट घेतल्यामुळे ती भाजली गेली. 6 वर्षाची असताना प्रथमोपचार करुन तिला बरे केले होतेे. परंतू वाढत्या वयामुळे तिला उठणे, बसणे, चालणे मुस्कील होत होते. वडील शिवाजी मस्कर व आई आशा मस्कर यांनी राधिकाला हाॅस्पिटल मध्ये तपासणीसाठी नेल्यानंतर तिची प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला. या ऑपरेशनसाठी खर्च मोठा होता. सदर उपचार महात्मा फुले जीवनदायी योजना मध्ये बसत नाही तसेच अन्य कोणाकडून यासाठी मदत झाली नाही. दि.23 एप्रिल, 2023 रोजी कु.राधिका ला ऍडमिट केले. कृष्णा हाॅस्पिटलचे सर्जरी तज्ञ डाॅ.चिन्मय विंगकर यांनी राधिकाची प्लाॅस्टीक सर्जरी यशस्वी केली. 23 मे, 2023 ला राधिका डिस्चार्ज मिळाला. डाॅ.संदीप डाकवे, सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षप्रमुख मंगेश चिवटे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी सहाय्यक रविंद्र ननावरे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी सहाय्यक करमाळे रोहित वायभासे यांच्याशी संपर्क साधून निधी मिळवण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला.
डाकेवाडीतील मस्कर परिवाराने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...