सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

खा.शरद पवार यांचेकडून डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे कौतुक

खा.शरद पवार यांचेकडून डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे कौतुक

तळमावले/वार्ताहर
देशाचे माजी संरक्षण मंत्री व कृषी मंत्री खा.शरद पवार यांनी डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे कौतुक केले. डाॅ.डाकवे यांनी पवार यांना स्केच दिले. डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून भेट दिले जाणारे हे 14000 वे स्केच आहे. याप्रसंगी खा.श्रीनिवास पाटील, आ.बाळासाहेब पाटील, लेफ्टनंट जनरल पी.रास पन्नू, कर्नल संभाजी पाटील, अरुण जाधव, शारदा जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते. सदर भेट पवार यांना देण्यासाठी माजी नगरसेवक सादिक इनामदार, ऍड .संभाजीराव मोहिते, उत्तम धर्मे व विजय समारोह दिवस समितीचे सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.
डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील दिग्गजांना आपली चित्रे भेट दिली आहेत. त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. कलेच्या माध्यमातून मिळणाऱ्या मानधनातील काही रक्कम गरजूंना दिली आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांना त्यांच्या कलेची भुरळ पडली आहे.
यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री विश्वनाथ कराड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय अर्थमंत्री आनंदराव अडसूळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.आर.आर.पाटील (आबा), पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, खा.श्रीनिवास पाटील, खा.अमोल कोल्हे, खा.डाॅ.भालचंद्र मुणगेकर, खा.राजू शेट्टी, माजी खा.संभाजी छत्रपती, आ.बाळासाहेब पाटील, आ.सुनिल राऊत, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील (काका), माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी मंत्री प्रा.राम शिंदे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आ.आनंदराव पाटील, माजी आ.नरेंद्र पाटील, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर, अतुल भोसले, पांडूरंग संकपाळ, चित्राताई वाघ, पद्मश्री पोपटराव पवार इ.सह अन्य राजकीय नेत्यांना डाॅ.संदीप डाकवे यांनी चित्रे दिली आहेत.
या सर्व मान्यवरांनी डाॅ.संदीप डाकवे व त्यांनी राबवलेल्या कलात्मक उपक्रमांचे कौतुक केले आहे.

!!: डाॅ.संदीप डाकवे यांची 14000 वी कलाकृती :
डाॅ.संदीप डाकवे यांनी शरद पवार यांना दिलेली ही 14000 वी कलाकृती आहे. यापूर्वी डाॅ.डाकवे यांनी स्क्रिबलिंग मधून पवार यांचे चित्र रेखाटले होते. गतवर्षी 82 पोस्टकार्ड पाठवून वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याची नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये झाली आहे.
दरम्यान, खा. पवार यांना चित्र देताना यापूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या उपक्रमांची, कात्रणांची माहिती डाॅ.डाकवे यांनी दाखवली. पवार यांनी ती बारकाईने पाहिली. या संग्रहाचे कौतुक करत शरद पवार यांनी डाॅ.संदीप डाकवे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...