डाॅ.संदीप डाकवे यांची हटके कलाकृती शब्दचित्र रेखाटून पालकमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...!
तळमावले/वार्ताहर
महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा यांचे शब्दचित्र रेखाटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी दिल्या आहेत. ना.शंभूराज देसाई यांचा वाढदिवस आणि डाॅ.संदीप डाकवे यांची हटके कलाकृतीची भेट असे समीकरण गेले काही वर्षे झाले आहे. यापूर्वी त्यांनी ठिपके, रांगोळी, अक्षरगणेशा, पोस्टर पोट्रेट, 72 वह्यामधून ना.देसाई यांची साकारलेली चित्रे देवून शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या 54 चित्रांची नोंद ‘‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’’ या पुस्तकाने घेतली आहे. डाॅ.संदीप डाकवे यांच्या वैविध्यपूर्ण प्रदर्शन, हस्तलिखीत यांचे उद्घाटन ना.देसाई यांच्या हस्ते झाले आहे. यापूर्वी ना.शंभूराज देसाई आणि डाॅ.संदीप डाकवे यांच्या सोबतच्या सुमारे 500 हून अधिक छायाचित्राचे ‘‘स्नेहबंध’’ नावाने फोटो बायोग्राफीक बुक प्रकाशित झाले आहे. डाॅ.डाकवे यांच्या अनेक कार्यक्रमांना ना.शंभूराज देसाई यांची उपस्थिती हे एक वैशिष्ट्य आहे. गत काही वर्षापासून ना.देसाई यांना आपल्या कलेतून शुभेच्छा देत असलेल्या डाॅ.डाकवे यांच्या यावर्षाच्या कलात्मक शुभेच्छा कशा असणार? याची उत्सुकता सर्वांना होती.
शब्दचित्र रेखाटण्यात माहीर असलेल्या डाॅ.संदीप डाकवे यांनी उत्कृष्ट संसदपट्टू, माजी गृहराज्यमंत्री, साहेब, पालकमंत्री, नामदारसाहेब, मंत्री महोदय, शंभूराज देसाई अशा विविध शब्दात ना.शंभूराज देसाई यांचे अनोखे चित्र रेखाटले आहे या चित्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा