रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

*रयत सेवक वडिलांचा स्मृतिदिन निराश्रित मुलांच्या समवेत साजरा*

*रयत सेवक  वडिलांचा स्मृतिदिन निराश्रित मुलांच्या समवेत साजरा* 

कै सखाराम बापू कचरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रा.ब. काळे जीवन शिक्षण मंदिर सातारा यांचा सहावा स्मृतिदिन  कोणतेही धार्मिक विधी न करता छ.शाहू बोर्डिंग शाखा नंबर १ येथील निराश्रित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या   मुलांना मिष्ठान्न  स्नेहभोजन देऊन  वेगळ्या पध्दतीने साजरा करण्याचा नवोपक्रम श्री बाळासाहेब कचरे व परिवाराने केला.कर्मवीरांच्या पुनित स्पर्शाने पावन झालेल्या परिसरात आपल्या वडिलांनी सेवा पूर्ण केली.याची जाण व त्याच परिसरात त्यांच्या स्मृती जागवून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या समवेत सहावा स्मृतिदिन अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला.या प्रसंगी बाळासाहेब कचरे सर यांनी आपले वडील व कर्मवीर आण्णा यांच्यातील प्रसंगांना उजाळा दिला.धार्मिकता व कर्मकांडांना बगल देत असे समाजउपयाेगी उपक्रम साजरे व्हावेत.या प्रसंगी कचरे कुटूंबीय व मैत्रीच्या झाडाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...