सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेबरोबर युवकांची मांदीयाळी.


चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेबरोबर युवकांची मांदीयाळी.

                

पाटण दि.10:- महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादायांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून पाटण विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच युवकांची मांदीयाळी होती.तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने पारंपारीक वाद्यांचे नियोजनही करण्यात आले होते.दरम्यान मुंबई येथील नियोजित बैठकांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी कालच मा.यशराज देसाई (दादा) यांना कोयना दौलत निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच आज श्रीमती विजयादेवी देसाई(मॉसाहेब),सौ.स्मितादेवी देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा), सौ.अस्मितादेवी देसाई,चि.जयराज देसाई,चि.आदित्यराज देसाई,ईश्वरी दिदी यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मायशराज देसाई (दादायांचा वाढदिवस  प्रतिवर्षी  मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी मा.यशराज देसाई (दादायांना साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा प्रशासनाचेवतीने सातारा येथील कोयना दौलत निवासस्थानी  प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.त्यानंतर वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा येथील एहसास मतीमंद मुलांचे शाळेमध्ये खाऊवाटप करण्यात आले. त्यांनतर त्यांनी दौलतनगर येथील श्री गणेश मंदिरामध्ये श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर मा. यशराज देसाई दादा यांचे औक्षण केले.तद्नंतर मरळी गावचे ग्रामदैवत श्री निनाईदेवी मंदिर येथे निनाईदेवीचे दर्शन घेतले. श्री. निनाईदेवी मंदीरामध्ये मरळी ग्रामस्थांच्या मा. यशराज देसाई यांनी शुभेच्छा स्विकारल्या. त्यानंतर कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब), स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयाचे दर्शन घेऊन त्यांनी कारखाना परिसरातील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे  पुर्णाकृती  पुतळयाचे दर्शन घेतल्यानंतर शिवविजय हॉल येथे मा.यशराज देसाई (दादा)  यांचे पारंपारीक वाद्यांच्या गजरात आगमण झाले. शिवविजय हॉल येथे वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केल्यानंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचेकडून शुभेच्छा स्विकारल्या.वाढदिवसानिमित्त तारळे विभागातील वजरोशी येथील पारंपारिक लेझीम पथक, आदमापूर येथील गजी नृत्य तसेच हालगी वादक अशा पारंपारिक कला या वेळी उपस्थितांना बघायला मिळाल्या.

            मा.यशराज देसाई यांना  शुभेच्छा देण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होतीमा.यशराज देसाई यांना दूरध्वनीव्दारे व समक्ष भेटून हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे,खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटीलप्रदीप पाटीलप्रकाश तवटे, सारंग पाटील,कृष्णा बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले(बाबा),विनायक भासले(बाबा) सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनावणे,परिक्षित थोरातराजेंद्र देसाईपरेश शेठराजेंद्र देसाई कोल्हापूरकारखान्याचे व्हाचेअरमन पांडूरंग नलवडेमाजी चेअरमन डॉदिलीपराव चव्हाणअशोकराव पाटील शिवदौलत बँकेचे माजी चेअरमन ॲङ मिलिंद पाटीलसंचालक शशिकांत निकम, बळीराम साळुंखे, शंकर पाटील, सोमनाथ खामकर,गजानन जाधव,विकास गिरी-गोसावी,विजयराव जंबुरे, प्रकाशराव जाधव,प्रकाश पवारजिल्हा परिषद सदस्य विजय पवार,बशीर खोंदु,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई सुरेश पानस्कर,संतोष गिरीपांडूरंग शिरवाडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, विजयराव मोरे, टी.डी. जाधव, शिवाजीराव शेवाळे, गणेश काजारी, शिवसेना पदाधिकारी राजेश चव्हाण,सागर नलवडे, रत्नदिप जाधव, राजकुमार कदम, हणमंत जाधव, आनंदाराव काळे, अमोल पाटील, शिवाजी देसाई, गोरख देसाई, माणिक पवार, विजय पवार फौजी, अमोल घाडगे, कांता सोनवले, शिवाजी बोंगाणे, प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, अशोकराव पाटीलसावळाराम लाड,भागोजी शेळके,दिपक सुतार, मिलींद पाटील, सलीम इनामदार, गणीभाई चाफेरकर, सुरेश जाधव विठ्ठल पवार, विलास कु-हाडे, वायकेजाधव,संजय शिर्के विनायक शिर्के,अरविंद पवार, विष्णू पवार, गणेश भिसे,किसन गालवे,संजय देशमुखउत्तम मोळावडे,प्रविण पाटीलजालंदर पाटीलमाजी पंचायत समिती सदस्य ॲङ डी.पी.जाधव,नथूराम कुंभारबबनराव शिंदे,अमोल चव्हाणअभिजित चव्हाण,धनाजी केंडेराजेंद्र पाटीलविष्णू पवार,अरविंद पवार, शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,नाना साबळे,संजय शिर्के,हेमंत पवारप्रकाश टोपले,महिपती गायकवाड,नथूराम सावंत,निवृत्ती कदम,दादा जाधव,संतोष पवार,शंकर पाटील,किसन पवार,माणिक पवारविठ्ठलराव जाधवबाळासो सुर्यवंशीराजेंद्र चव्हाणविश्वास निकम,रविंद्र सपकाळ,रामभाऊ कदम, रविंद्र जाधव,नाना पवार,मनोज मोहितेशिवाजी घार्गेराजाराम मोहितेमधुकर पाटील,नेताजी मोरेॲङ बाबूराव नांगरे, प्रकाश पाटील, हणमंतराव चव्हाण, सचिन पवार, मोहन चव्हाण, अविनाश पाटील, सचिन पाटील, नारायण कारंडे, पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडेतहसिलदार रमेश पाटीलगट विकास अधिकारी गोरख शेलारउपअभियंता विद्याधर शिंदे,घंटेशाखा अभियंता संदीप पाटील, नरबट, हराळे भोसले, शंभूराज युवा संघटनेचे अध्यक्ष भरत साळूंखे,अभिजित पाटीलधनाजी शेवाळेजय मल्हार मातंग संघटनेचे अध्यक्ष बबनराव भिसेउत्तम मगरे, कारखान्याचे व्हा. चेअरमन राजाराम पाटील, माजी संचालक मधूकर भिसे,बबनराव पाटील, दै.पुढारीचे तुषार देशमुख, दै.तरुण भारतचे संपादक दिपक प्रभावळकर, संभाजी भिसेदैनिक सकाळचे अरुण गुरव यांच्यासह विविध गावातील सरपंचउपसरपंचतालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,डॉबाबासाहेब आंबेडकर विचार मंच पाटण तालुकाजयमल्हार मातंग संघटना पाटण तालुकाकोयना परिसर साखर कामगार संघटना,शिवसेना,युवासेना,पाटण तालुका शंभूराज युवा संघटना तसेच तालुक्यातील देसाई कुटूंबावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्तेहितचिंतक यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

 


रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

*रयत सेवक वडिलांचा स्मृतिदिन निराश्रित मुलांच्या समवेत साजरा*

*रयत सेवक  वडिलांचा स्मृतिदिन निराश्रित मुलांच्या समवेत साजरा* 

कै सखाराम बापू कचरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रा.ब. काळे जीवन शिक्षण मंदिर सातारा यांचा सहावा स्मृतिदिन  कोणतेही धार्मिक विधी न करता छ.शाहू बोर्डिंग शाखा नंबर १ येथील निराश्रित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या   मुलांना मिष्ठान्न  स्नेहभोजन देऊन  वेगळ्या पध्दतीने साजरा करण्याचा नवोपक्रम श्री बाळासाहेब कचरे व परिवाराने केला.कर्मवीरांच्या पुनित स्पर्शाने पावन झालेल्या परिसरात आपल्या वडिलांनी सेवा पूर्ण केली.याची जाण व त्याच परिसरात त्यांच्या स्मृती जागवून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या समवेत सहावा स्मृतिदिन अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला.या प्रसंगी बाळासाहेब कचरे सर यांनी आपले वडील व कर्मवीर आण्णा यांच्यातील प्रसंगांना उजाळा दिला.धार्मिकता व कर्मकांडांना बगल देत असे समाजउपयाेगी उपक्रम साजरे व्हावेत.या प्रसंगी कचरे कुटूंबीय व मैत्रीच्या झाडाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

अक्षरगणेशा उपक्रमातून मंदीर जीर्णोध्दासाठी खारीचा वाटाडाॅ.संदीप डाकवे यांच्या स्पंदन ट्रस्टने दिली 11,111/- ची मदत

अक्षरगणेशा उपक्रमातून मंदीर जीर्णोध्दासाठी खारीचा वाटा
डाॅ.संदीप डाकवे यांच्या स्पंदन ट्रस्टने दिली 11,111/- ची मदत
तळमावले/वार्ताहर
महाराष्ट्र राज्यातील नामवंत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत डाॅ.संदीप डाकवे यांच्या संकल्पनेतून ‘एक अक्षरगणेशा मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी’ असा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमात अक्षरगणेशा रेखाटून घेणाऱ्यांकडून मुल्य स्वीकारण्यात येत होते. या उपक्रमांतर्गत जमलेली रु.11,111/- ची देणगी मंदिर समितीकडे ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे व पदाधिकारी यांनी नुकतीच सुपुर्द केली. अशाप्रकारे अक्षरगणेशातून मदत करण्याचे हे 6 वे वर्ष आहे.  
डाॅ.संदीप डाकवे हे गेली सुमारे17 वर्षापासून अक्षरगणेशा उपक्रम राबवत आहेत. आतापर्यंत त्यांनी अक्षरगणेशा व कलात्मक उपक्रमांच्या माध्यमातून नाम फाऊंडेशनला 35 हजार, केरळ पुरग्रस्तांना 21 हजार, विद्यार्थ्यांच्या फी साठी 6 हजार, मंदिर जीर्णोध्दारासाठी 5 हजार 555, ईशिता पाचुपते 5 हजार, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला 5 हजार, माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना 5 हजार, मुख्यमंत्री सहायता निधीस 3 हजार, मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19 ला 4 हजार, शांताई फौंडेशनला 2 हजार 222, मंदिर जीर्णोध्दार 1 हजार, भारत के वीर या खात्यात 1 हजार अशी सुमारे एक लाखापर्यंत रोख स्वरुपात मदत केली आहे. या बरोबरच एक लाखाहून जास्त किमतीचे शैक्षणिक साहित्य विविध शाळांना दिले आहे. अर्थात हे सर्व लोकसहभागातून केले असल्याचे डाॅ.संदीप डाकवे हे जाहीररीत्या कबूल करतात.
डाॅ.संदीप डाकवे यांनी 20 पेक्षा जास्त कलात्मक उपक्रम राबवत आपले वेगळेपण जपले आहे. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये तीनदा, हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये एकदा तर वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड बुक मध्ये दोनदा झाली आहे. याची दखल घेत इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी 30 पेक्षा जास्त स्पेशल रिपोर्ट प्रसारित आहेत. तर सहयाद्री दूरदर्शन वाहिनीवर अर्ध्या तासाची मुलाखत प्रसारित केली आहे
कलेबरोबर कात्रण प्रदर्शन, हस्तलिखीत पुस्तकांची मुखपृष्ठे रांगोळी, भित्तीचित्रे, बोलक्या भिंती रेखाटन अशा वेगवेगळया स्वरुपात काम केले आहे. व्यक्तिचित्राबरोबर शब्दचित्रे, पेपर कटींग आर्ट, मोरपीस, तांदूळ अशा विविध माध्यमातून त्यांनी कलाकृती साकारत आपले वेगळेपण जपले आहे. तर ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, अवॉर्ड सोहळा, स्पर्धा राबवत आपले अष्टपैलूत्व सिध्द केले आहे. तसेच डाॅ.डाकवे यांनी सोशल मिडीयाच्या युगात पत्रमैत्रीचा छंद आवर्जून जपला आहे. त्यांची 500 पेक्षा जास्त पत्रे विविध वृत्तमानपत्रातून प्रसिध्द झाली आहेत. विविध सामाजिक समस्यांवर लेखन, 20 पेक्षा जास्त सेलिब्रिटींच्या मुलाखती, सुमारे 16 वर्षाहून अधिक काळ दिवाळी व इतर अंकांचे संपादन करत पत्रकारिता करत आहेत. 12 हजारहून जास्त मान्यवरांना डाॅ.डाकवे यांनी चित्रे भेट दिली आहेत. डाॅ. संदीप डाकवे यांची सात पुस्तके प्रकाशित झाली असून 5 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत विविध संस्थांनी 50 पेक्षा जास्त तर महाराष्ट्र शासनाने 4 पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले आहे.
अक्षरगणेशा उपक्रमातून मंदीराच्या जीर्णोध्दारासाठी खारीचा वाटा म्हणून रु.11,111 ची देणगी देवून डाॅ.संदीप डाकवे व स्पंदन ट्रस्टने आपल्या गावाप्रती असणारी नाळ जपत अक्षरगणेशातून मदत ही परंपरा जपली आहे.

सेलिब्रिटी व इलेक्ट्राॅनिक माध्यमांकडून कौतुक :
सुप्रसिध्द अभिनेत्री दिप्ती भागवत, अभिनेते अमोघ चंदन व अन्य सेलिब्रिटी यांनी ‘एक अक्षर गणेशा मंदीरा जीर्णोध्दारासाठी’या उपक्रमासाठी व्हिडीओ संदेश पाठवून डाॅ.संदीप डाकवे यांचे कौतुक करत या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन देखील केले होते. तसेच साम टीव्ही, लोकशाही या इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी यावर स्पेशल रिपोर्ट करत संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम पोहोचवला त्यामुळे अनेकांनी त्यात सहभाग घेतला. त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रीया स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली.

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०२२

तळमावले ; आपले जीवन समाधानी व आनंदी होण्यासाठी प्रत्येकाने किमान एका कलेत पारंगत व्हावे. मा. गौरव गाडे

तळमावले ; आपले जीवन समाधानी व आनंदी होण्यासाठी प्रत्येकाने किमान एका कलेत पारंगत व्हावे. मा. गौरव गाडे              
तळमावले दि. ४ ऑक्टो. २०२२ : -  बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक अशा आपल्या देशाला विविध कलांचा समृद्ध वारसा लाभला आहे. मानवी जीवनात चित्र, संगीत, साहित्य आदी कलांना अढळ स्थान आहे. कलेशिवाय मानवी जीवन निरर्थक आहे. कलेविना जीवन जगणारा माणूस पशूसमान आहे. संगीतातील वेगवेगळे राग आणि मानवी आयुष्याचे तरंग समान आहेत. विविध कलाव्यवहारामुळे मानवी जीवनाला पूर्णत्व प्राप्त होते. म्हणून  प्रत्येकाने किमान एक कला अवगत करावी,  असे प्रतिपादन मा. गौरव गाडे यांनी केले.काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथील ' सांस्कृतिक विभाग व वाङ्मय मंडळ विभाग ' उद्घाटन समारंभानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून ' साहित्य, कला आणि आपले जीवन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते  बोलत होते.                          
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. उषादेवी साळुंखे या होत्या.गौरव गाडे पुढे म्हणाले, साहित्य वाचनाने आपले जीवन अनुभव समृद्ध होते.  मानवी जीवनाचे प्रतिबिंब साहित्यात पडलेले असते. पाश्चिमात्य साहित्य व्यक्तिकेंद्रित आहे, भारतीय साहित्य विश्वव्यापी आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक प्रतिभावंतांनी साहित्य समृद्ध केले आहे. दिवंगत महान गायिका लता मंगेशकर  यांनी गायन कलेसाठी आयुष्य समर्पित केले. कोणतीही कला सातत्यपूर्ण अभ्यास, सततचा सराव, रियाज यातून आत्मसात करता येते. नाटक हे महाराष्ट्रीय माणसाचे वेड आहे असे  म्हटले जायचे. नाटकाचा रंगमंच वा आयुष्याचा रंगमंच स्त्रीशिवाय उदासवाणा, अधुरा  वाटतो. छांदोग्य उषनिषदात स्त्रीचे महत्व प्रतिपादिले आहे.अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. यु. ई. साळुंखे म्हणाल्या, महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमात, सांस्कृतिक कार्यक्रमात, स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे  सहभागी  व्हावे. विद्यार्थ्यांच्या अंगच्या सर्वच कलागुणांना वाव देणारे शिवाजी विद्यापीठाचे युवा महोत्सवाचे व्यासपीठ आहे त्याचाही आपण लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या  कार्यक्रमास प्राचार्य डॉ. अरुण गाडे,  सौ. गाथा  वाघमारे, प्रशांत वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील  गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. 
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा. महेश चव्हाण यांनी केले. पाहुण्यांचा परिचय गवराम पोटे यांनी करून दिला. सूत्रसंचालन  प्रा. सौ. बी. एस. सालवाडगी यांनी केले. आभार प्रा.डॉ. मनोज सादळे यांनी मानले.

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२

स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या कुटूंबियांचे विविध मान्यवरांकडून सांत्वन

स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या कुटूंबियांचे विविध मान्यवरांकडून सांत्वन

तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील समाजशील व्यक्तिमत्त्व राजाराम विठ्ठल डाकवे (तात्या) यांचे आकस्मित निधन झाले. सुप्रसिद्ध चित्रकार डॉ. संदीप डाकवे यांचे ते वडील होत. राजाराम डाकवे यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डाकवे कुटूबियांची भेट घेवून सांत्वन केले व त्यांना मानसिक आधार दिला.
शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब कदम, जि.प.साताराचे माजी शिक्षण, अर्थ व क्रीडा सभापती संजय देसाई, पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, सुप्रसिध्द शिवव्याख्याते प्रा.अरुण घोडके, उद्योजक सर्जेराव यादव, विटा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सारिका सपकाळ, राष्ट्रपती पारितोषिक विजेते सर्जेराव टकले, पोलीस निरीक्षक एन.आर.चौखंडे, प्रा.ए.बी.कणसे, डाॅ.राहूल पाटील, डाॅ.अजय सपकाळ, कलाशिक्षक बाळासाहेब कचरे, जयंत कदम, सुरेश जाधव, टीव्ही 9 चे पत्रकार दिनकर थोरात, दै.पुढारीचे उपसंपादक अशोक मोहने, संदीप चेणगे, ह.भ.प.रामदास महाराज, मर्चंट सिंडीकेटचे अध्यक्ष अनिल शिंदे, जनसहकारचे मारुती मोळावडे, सुभेदार मेजर शंकर जाधव, सुभेदार जगन्नाथ शिद्रुक, कुमजाई पर्व चे संपादक प्रदीप माने, पत्रकार पोपट माने, कुस्ती निवेदक सुरेश जाधव, धगधगती मुंबईचे संपादक भिमराव धुळप, समस्त शिवसमर्थ परिवार यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेवून डाकवे कुटूंबियांचे सांत्वन केले.
तसेच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, खा.श्रीनिवास पाटील, प्रा.ए.व्ही.देशपांडे, सुनील पवार चाफळ यांनी शोकसंदेशाव्दारे, महंत स्वामी आबानंदगिरीजी महाराज, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, दिग्दर्शक विठ्ठल डाकवे, प्राचार्य डाॅ.जे.एस.पाटील, डाॅ.राजेंद्र कंटक, दै.नवाकाळचे उपसंपादक शंकर कडव यांनी दूरध्वनीव्दारे संवाद साधन सांत्वन करुन धीर दिला. तर रक्षाविसर्जनप्रसंगी वसंत डाकवे, अनिल डाकवे, कृष्णाकाठ चे संपादक चंद्रकांत चव्हाण, आदर्श सरपंच रविंद्र माने, विठ्ठलराव पाचुपते, अॅड.विठ्ठलराव येळवे, देवबा वायचळ सर, विलासराव येळवे, जे.वाय.मोरे सर, ह.भ.प.धोंडीराम महाराज यांनी श्रध्दांजली वाहून स्व.राजाराम डाकवे यांच्याविषयींच्या भावना व्यक्त केल्या.
प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्ती तसेच व्हाॅटसअप, फेसबुक, सोशल मिडीया याव्दारे सांत्वन करुन कुटूंबाला धीर दिल्याबद्दल या सर्वांचे डाकवे परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...