पाटण : ३१ डिसेंबर रोजी वनविभागाच्या क्षेत्रात कोणी पार्टी करताना आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा हेळवाक ता.पाटण वनक्षेत्रपाल (वन्यजीव) एस.ए.जोपळे यांनी एका पत्रकाद्वारे दिला.या दिवशी विशेषता भैरवगड,केमसे,सासरी,
दलधाम, ढनकल, अंबा मातामंदिर,बोपोली,कोंढवळे,धबधबा,रामघळ परिसरात दिवस-रात्र गस्त घालण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी वन विभागाचा विरोध नाही. मात्र त्याचे निमित्त साधून वन क्षेत्रांमध्ये चुली पेटवणे, फटाक्यांची आतिषबाजी याला विरोध आहे. वन क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींना निर्बंध आहेत. त्यामुळे या दिवशी क्षेत्रांमध्ये पार्ट्या करू नयेत अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा श्री.एस.ए.जोपळे
यांनी दिला आहे.तसेच या दिवशी दिवस आणि रात्र वन विभागाचे कर्मचारी साध्या वेशात पेट्रोलिंग करणार असून अशा प्रकारचे कृत्य करताना कोणी आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा