पाटण :रस्ते पुलाच्या कामासाठी ७२ कोटी ४ लाख रुपयांचा निधी मंजूर
पाटण : जुलै महिन्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण रस्त्यांचे,साकव पूलांचे , प्रमुख जिल्हा मार्ग , राज्य मार्ग यांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले होते . त्यामुळे या मार्गांवरुन दळण - वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने या नुकसान झालेल्या विविध विकास कामांचे पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाच्या माहे डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद होण्यासाठी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिफारस केली होती . त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ग्रामीण रस्त्यांचे व साकव पूलांच्या कामांसाठी ५० कोटी तर प्रमुख जिल्हा मार्ग , राज्य मार्ग यांच्या भूसंपादनासह सुधारणा करण्याच्या कामांसाठी २२ कोटी ४ लाख असा एकूण ७२ कोटी ४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे .
---------------------------------------
ही आहेत मंजूर कामे
: पाटण - मणदुरे - जळव - तारळे - पाल रस्ता पाटण ते साखरी रुंदीकरणासह सुधारणा ३ कोटी २० लाख ,
- पाटण - मणदुरे - जळव - तारळे पाल - निवडे पुनर्वसन ते पाल रुंदीकरणासह सुधारणा २ कोटी ३० लाख .
- वाखानवस्ती कराड - ढेबेवाडी सणबुर - महिंद - नाटोशी - मोरगिरी - चाफेर - महिंद ते गडगडा भुसंपादन व सुधारणा २ कोटी . - चरेगांव - चाफळ - दाढोली - महाबळवाडी - येरफळे - त्रिपुडी - चोपडी - बेलवडे - आंब्रुळे - कुसरुंड - नाटोशी रस्ता येरफळे ते त्रिपुडी भुसंपादन व सुधारणा १ कोटी .
- सातारा - गजवडी - चाळकेवाडी - घाणबी - केर - पाटण - घाणबी फाटा ते घेरादातेगड फाटा सुधारणा ९० लाख .
- नागठाणे - तारळे - पाटण रस्ता कोंजवडे फाटा ते वजरोशी रुंदीकरणासह सुधारणा २ कोटी .
- इजिमा 138 ते निगडे - कसणी - निवी - डाकेवाडी - धामणी - चव्हाणवाडी - मस्करवाडी - घराळवाडी रस्ता कसणी गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम २ कोटी .
- नाडे - सांगवड - मंद्रुळकोळे - ढेबेवाडी रस्ता वांग नदीवर मंद्रुळकोळे येथे मोठया पुलाचे बांधकाम ६ कोटी ५० लाख .
- त्रिपुडी - मुळगांव - कवंरवाडी - नेरळे - गुंजाळी - लेढोंरी - मणेरी - चिंरबे - काढोली - चाफेर - रिसवड - ढोकाळे कवरवाडी ते चेवलेवाडीचे बांधकाम २ कोटी ५० लाख या कामांचा समावेश आहे .
राज्य शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या विकास कामांची लवकरच निविदा कार्यवाही करण्यात येऊन दळण - वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा