वाझोली ग्रामपंचायत नूतन कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा युवा नेते रविराज देसाई यांच्या हस्ते संपन्न
कुमजाई पर्व प्रतिनिधी -मनोज सावंत
वाझोली .ता पाटण येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन तालुक्याचे विकास कामाचे महामेरू राज्याचे गृहराज्यमंत्री मंत्री शंभुराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातु मिळालेल्या 10 लाख रुपये मंजुरीचे काम हे मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री रविराज देसाई (दादा)यांच्या शुभहस्ते व पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना वाझोली गावचे शिवसेना शाखा प्रमुख आनंदा मोरे यांनी
मा.नामदार साहेबांच्या माध्यमातून वाझोली,डाकेवाडी,व सलतेवाडी.या तीन्ही गावात कोट्यावधींची विविध विकासकामे पुर्ण झाली आहे.येणाऱ्या काळातसुद्धा मा.नामदारसाहेबांच्या माध्यमातून प्रलंबित असणारी विकास कामे पुर्ण करुन वाझोली हे गाव विकासाचे आदर्श गाव बनवु.मा.नामदार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहु अशी ग्वाही त्यांनी दिली.
आज भूमिपूजन झालेल्या वाझोली ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे काम दर्जेदार करावे,कारण गावची सर्व विकासकामे जेथुन केली जातात ,तो महत्त्वाचा केंद्रबिंदु असलेली ग्रामपंचायत ही इमारत चांगली होणे गरजेचे असून वाझोली गावामध्ये या पुढेही ना.शंभुराज देसाई यांच्या प्रयत्नातून होतील असे रविराज देसाई यांनी संभोधले.
वाझोली गावच्या एकजुटीची पहिल्यापासून काळगाव गणामध्ये वेगळी ओळख असून कायम व सतत वाझोली गावाने ना.गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ,विधानसभा निवडणुकीमध्ये वाझोली या गावाने चांगल्या प्रकारचे मताधिक्य दिले असल्याचे पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई यांनी वक्तव्य केले
या वेळी पंचायत समिती काळगाव गणाचे सदस्य श्री पंजाबराव देसाई (तात्या) शिवसेना तालुका प्रमुख राजेश चव्हाण ,शंभुराज देसाई साहेब यांचे विश्वासू कार्यकर्ते व मर्चंट सिंडिकेट संस्था तळमावले येथील चेअरमन श्री अनिल शिंदे साहेब,सागर नलवडे शिवदौलत बँकेचे संचालक मधुकर पाटील गावचे सरपंच शितल लोहार,उपसरपंच सविता मोरे,गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य अशोक मोरे,आनंदा मोरे तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील ,सदस्य सुशीला मोरे, रमेश लोहार सदाशिव शेलार,शिवाजी मोरे,जयवंत मोरे सूर्यकांत मोरे,धनाजी मोरे,ग्रामसेविका स्वाती माळी व पोलीस पाटील विजय सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. तरी कार्यक्रमाचे आभार आनंदा मोरे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा