*पोटनिवडणुकीबाबत सविस्तर माहिती न देता अंधारात ठेवल्याने चोरजवाडी ग्रामस्थांमध्ये संताप*
उंब्रज:- २८ डिसें - चोरजवाडी ता.कराड ग्रामपंचायतीमध्ये आरक्षित उमेदवाराअभावी रिक्त असलेल्या जागेची पोटनिवडणूक लागली;मात्र त्या निवडणुकीची सध्याची आरक्षण सोडत व इतर माहिती सार्वजनिक अथवा नोटीस न लावता अंधारात ठेवल्याने त्या जागा पुन्हा रिक्त राहिल्याने ग्रामस्थांमध्ये स्थानिक ग्रामसेवक व तलाठी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
चोरजवाडी ग्रामपंचायतमध्ये एकूण सात सदस्य असून त्यामध्ये पाच जागा निवडून आल्या आहेत. दोन जागा ओ.बी.सी.आरक्षित उमेदवार न दिल्याने रिक्त होत्या,त्या जागेच्या आरक्षणात बदल होऊन २१ डिसेंबर रोजी जे मतदान झाले त्या साठी वार्ड क्रमांक १ मधील जागा सर्वसाधारण पुरुष यासाठी खुली झाली होती मात्र निवडणूक प्रक्रिया व आरक्षण सोडत या बाबाची अधिकृत माहिती सार्वजनिक अथवा नोटीस न लावल्याने ती जागा रिक्त राहिली. याबाबत ग्रामसेवक दादासो केंगार यांच्याकडे विचारणा केली असता ते निवडणूक प्रक्रिया तलाठी पाहतात व तलाठी महापुरे यांच्याशी विचारणा केली असता मी ग्रामसेवक केंगारे व ग्रामपंचायत सदस्य याना माहिती दिली होती असे उत्तर देऊन जबाबदारी झटकली जात आहे.
त्यामुळे काही ठराविक हेतूने ग्रामसेवक व सदस्यांनी नवीन सदस्य येऊ नये म्हणून कि काय ? ग्रामस्थांना आरक्षण व निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती व नोटीस लावली नाही कि काय ? अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये व्यक्त केली जात आहे.
कुमजाई पर्वशी बोलताना ग्रामस्थ अधिक मराठे यांनी सांगितले की
मी स्वतः अण्णासाहेब केंगार यांना फोन करून निवडणूक लागली तेव्हा आरक्षणविषयी विचारपूस केली तेव्हा त्यांनी अगोदर आहे तसे आरक्षण आहे असे बोलले एक जागा सर्वसाधारण साठी खुली आहे असे काही सांगितले नाही. नंतर काही दिवसांनी विचारपूस केली असता ते काम तलाठी यांचं आहे असं सांगून जबाबदारी झटकत होते मात्र मी याबाबत कायदेशीर तक्रार निवडणूक अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे करणार आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा