मान्याचीवाडी ता.पाटण येथे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी सायकल रॉली काढून जनजागृती केली. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी या रॉलीत सायकलसह सहभागी झाले होते. व्रक्षलागवड, व्रक्षसंवर्धन, पाण्याचा वापर, अपारंपारिक ऊर्जा वापर, घनकचरा व्यवस्थापन, हरीत अच्छादन, सांडपाणी व्यवस्थापन, जैवविविधता आदिंबाबत या सायकल रॉलीतून ग्रामस्थांमध्ये प्रबोधन केले.
यावेळी सरपंच रवींद्र माने, ग्रामसेवक प्रसाद यादव, दूध संस्थेचे चेअरमन सर्जेराव माने, मुख्याध्यापक किशोर बनसोडे, के.एस. खर्डे आदिंची उपस्थिती होती. सरपंच माने यांनी पर्यावरणाचा र्हास होऊ नये यासाठी गावात विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत त्यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्यावे असे सांंगून पर्यावरण वाचले तरच गाव वाचेल म्हणूनच व्रक्षसंवर्धन गरजेचे असल्याचे सांगितले. वसुंधरा अभियान अंतर्गत अग्नी, वायू, जल, प्रथ्वी आणि आकाश या पंचतत्वांबाबत विद्यार्थी आणि ग्रामस्थांना माहीती देऊन
हे अभियान यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा