गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

‘पॅनकार्ड क्लब लिमिटेड’ कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी – राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे निर्देश

‘पॅनकार्ड क्लब लिमिटेड’ कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी – राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे निर्देश

मुंबई, दि. 25 : पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळावा यासाठीच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. संबंधित सक्षम प्राधिकरण अधिकारी यांनी कंपनीच्या मालमत्तेच्या लिलावासंदर्भातील प्रकिया तातडीने राबवावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासदंर्भात राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री श्री.देसाई यांनी आर्थिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या.

राज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले, सिंधुदुर्ग, अमरावती, सातारा, नाशिक, नवी मुंबई, नागपूर येथे या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, ५१ लाख गुंतवणुकदारांची फसवणूक झाली आहे. या गुंतवणुकदारांना दिलासा देण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने मालमत्ता लिलावाची प्रक्रिया करण्यात यावी. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा असे निर्देशही राज्यमंत्री श्री.देसाई यांनी दिले.

या बैठकीस आमदार प्रकाश आबीटकर, आमदार किशोर पाटील, गृह विभागाचे उपसचिव रमेश मनाळे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

१३ टिप्पण्या:

  1. खरे आहे प्रत्येकाने काबाड कष्ट करून एक एक रुपया जमा करून पैसा यात गुंतवीला आहे तरी सरकारने जातीने लक्ष घालून आमचा गुंतविलेला पैसा मिळवून् द्यावा ही माझी नम्र विनंती आहें

    उत्तर द्याहटवा
  2. पॅनकार्ड कंपनीचा लवकरात लवकर लोकांना परतावा मिळेल पण अशी व्यवस्था करा ,

    उत्तर द्याहटवा
  3. पुण्यातील एक कंपनी रेलिग्रो प्रायव्हेट ली. कंपनीत ही लोकांची फसवणूक झाली आहे. यातही लक्ष घालावेआशी विनंती आहे.

    उत्तर द्याहटवा

  4. खरोखरच मंत्री महोदय आपण लक्ष देऊन आमचे अडकवून पडलेले पैसे मिळण्यासाठी लवकरच मदत करावी आम्ही काबाड कष्टाने कमावलेला पैसा अडकून पडला आहे मिळाला तर बरे होईल

    उत्तर द्याहटवा
  5. धन्यवाद मंत्री महोदय
    यात सर्वसामान्यांचे पैसे गुंतले आहेत,
    केंद्र आणि राज्य सरकार ला सर्व माहित असून ही लोकांचे पैसे द्यायला उशीर का लावतात ?
    लवकरात लवकर सर्वांचे पैसे द्यावेत
    एवढी माफक अपेक्षा.

    उत्तर द्याहटवा
  6. सामान्य माणसांनीच पैसे गुंतवलेले आहे. त्यांची फार होरपळ झालेली आहे. त्यांची ही होरपळ थांबविण्यासाठी कृपया तुम्ही केलेले कार्य मोलाचे ठरेल अशी आंम्ही . आशा बाळगतो.

    उत्तर द्याहटवा
  7. Jawabdaar ani DHOKA DENARA LABAD Company la shiksha jhalich pahije ani amcha kashta cha paisa milach pahije

    उत्तर द्याहटवा
  8. ह्या पॅनकार्ड कंपनीने खुप लोकांना गंडा घातला असुन लवकरात लवकर ह्याची प्रक्रिया सुरू व्हावी आणि जनतेला लाभ मिळावा हिच इच्छा आम्हा सर्वांची सभासदांची

    उत्तर द्याहटवा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...