तळमावले : येथे अपघात एक ठार दोघे जखमी
फोटो :घटनास्थळी पंचनामा करताना पोलीस अधिकारी (प्रतिनिधी /कुणाल माने)
------–-----------------------------------------कुमजाई पर्व न्यूज
तळमावले : येथे भरधाव वेगातील दुचाकीच्या झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला यामध्ये नितीन लोकरे वय 38 रा.कुठरे (मोरेवाडी)या युवक मृत झाला असून किरण सुपुगडे वय 27 रा.सुपुगडे वाडी कुठरे व अमरदीप पवार वय 21 रा.कुठरे दोघे जखमी झाले आहेत
याबाबत ढेबेवाडी पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की गुरुवारी दि.25 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास कुठरे परिसरातील तीन युवक दुचाकीवरून तळमावले हुन कराडच्या दिशेने निघाले होते त्यांची गाडी तळमावले येथे असलेल्या लाकडी मिल जवळ आल्यावर गाडीचा अपघात झाला या अपघातात नितीन लोकरे याचा मृत्यू झाला व त्याच्याबरोबर गाडीवरून आलेले किरण सुपुगडे व अमरदीप पवार हे दोघे जखमी झाले त्याच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .या अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.
–-------------------------------------------
दरम्यान येथिल नागरिकांनी या रस्त्यावर गतिरोधक बसवावा गतिरोधक अभावी गंभीर अपघात होत आहेत. तरी तळमावले येथील अपघात झालेल्या ठिकाणी गतिरोधक बसवावे व संभाव्य अपघात टाळावे अशी मागणी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा