तळमावले : काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात मतदार नोंदणी अभियान
तळमावले : भारत निवडणुक आयोगाचे निर्देशानुसार मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण अंतर्गत मतदार नोंदणी अभियान 261-पाटण विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री जांगडे साहेब - ( मंडल अधिकारी ,तळमावले) यांनी केले आहे.मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार नोंदणी अभियान दि. 1 नोव्हेंबर पासून राबविण्यात येत असून या अभियानात पाटण विधानसभा मतदार संघाचे कार्यक्षेत्रात दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासन व काकासाहेब चव्हाण महाविद्यालयतील राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत मतदार नोंदणी अभियान विशेष मोहीम राबविण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शनक -मा श्री जांगडे साहेब - ( मंडल अधिकारी ,तळमावले) अध्यक्ष - मा प्राचार्य
डॉ अरुण गाडे प्रमुख.उपस्थित - श्री प्रदिप सर, श्री अमोल चव्हाण तलाठी होते.या कार्यक्रमात श्री प्रदिप सरांनी ई - पिक संदर्भात सविस्तर माहिती सांगितली व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री जांगडे साहेबांचे स्वागत कॉलेजचे झेप अंक देवुन कॉलेजचे प्राचार्य डॉ अरूण गाडे साहेबांनी केले.प्रास्ताविक - प्रा.महेश चव्हाण (प्रकल्प अधिकारी, रा.से.यो.विभाग )
आणि आभार - प्रा सचिन पुजारी -सदस्य,रा.से.यो ज्यु. विभाग यांनी मानले
कार्यक्रमात सिनियर विभागातील काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र तंत्रज्ञान व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (ISO ) ऑनलाईन कोर्सेस घेतले होते या सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप प्रमुख मार्गदर्शक व प्राचार्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच ज्यु.व सिनि.कॉलेज मधील गुरूदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा