तळमावले : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन व्याख्यान संपन्न
तळमावले ता.पाटण येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त "महात्मा गांधीजींचे सत्य,अहिंसा व सत्याग्रह विषयक विचार" या विषयावर प्रा विशाल कांबळे ( राज्यशास्त्र विभाग, डी.के.एस.सी.कॉलेज, इचलकरंजी ) यांचे ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते ते म्हणाले महात्मा गांधी यांनी सत्य अहिंसा ही दोन शस्त्रे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात यशस्वीपणे वापरली आणि आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून दिले जगामध्ये अनेक देश शस्त्र बळाच्या सामर्थावर स्वतंत्र झाले पण गांधीजींनी एक अभूतपूर्व इतिहास घडवला हातात कोणतेही शस्त्र न घेता अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने जाऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.साधी राहणी उच्च विचारसरणी हा त्यांच्या व्यक्तिमह्त्वाचा गाभा होता.सत्याचे प्रयोग, सत्याग्रह, असहकार, सविनय कायदेभंग, ग्रामस्वराज्य, पर्यावरण, सर्वधर्मसमभाव आदी अनेक विषयांवर म. गांधीजींचे मौलिक विचार आजच्या बदलत्या काळात देखील सुसंगत असल्याचे दिसून येते. यासाठी गांधी जयंतीदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाने महात्मा गांधीजींचे सत्य अहिंसा व सत्याग्रह विषयक विचार प्रा कांबळे सरांनी अभ्यासपुर्ण आपले परखड मौलिक विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अरुण गाडे साहेब ( काकासाहेब चव्हाण महाविद्यालय,तळमावले ) होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.महेश चव्हाण (प्रकल्प अधिकारी ,रा.से.यो विभाग) तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.गवराम पोटे ( सांस्कृतिक विभाग प्रमुख )आणि आभार प्रा.संभाजी नाईक ( प्रकल्प अधिकारी,रा.से.यो विभाग )
कार्यक्रमास कॉलेज मधील व विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन व्याख्यानास उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा