पाटण तालुक्यातील क्रिकेट समालोचक
प्रविण वंडुस्कर (महाराज) यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आव्हानाला ला सर्व खेळाडूंनी दाद दिली.आणि मदतीचा हात पुढे केला.त्याचबरोबर जिद्दी मराठा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिशनचे अध्यक्ष विनोद कदम (स्वामी) यांनी ही या उपक्रमाला बहुमूल्य अशी साथ दिली.पाटण तालुका क्रिकेट असोशियेशन च्या माध्यमातून पाटण तालुक्यात आलेल्या महापुरामुळे भीषण संकट ओढवलेल्या बाधित कुटुंबाना त्यांच्याद्वारे मदत केली. त्यामध्ये आंबेघर,साईनगर,कोयनानगर जिंती, जितकरवाडी,धनावडेवाडी शिंदेवाडी, जोशेवाडी इतर अन्य गावात त्यांच्यामार्फत मदत पोहचवण्यात आली.
मदत योग्य व खऱ्या आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहोचावी यासाठी पाटण तालुका क्रिकेट असोसिशनचे सर्व कार्यकर्त यांनी अतिशय योजनापूर्वक अथक परिश्रम घेऊन आपत्तीग्रस्त ठिकाणे व बाधित नागरिकांची माहिती आगाऊ मिळविल्या मुळे व मदतकार्यात पुर्णपणे सहकार्य दिल्याने योग्य लोकांपर्यंत मदत पोहोचविण्याचे उत्तम नियोजन केल्यान मदत कार्यात सुलभता आणून वेळेवर योग्य व्यक्ती/कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविता आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा