गेल्या आठवड्यात पावसाने रौद्ररूप धारण करून अतिवृष्टी पाटण तालुक्यातील सर्वच गावांना फार मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने तसेच पुराच्या पाण्याने सर्वत्र हाहाकार माजविलयाने होत्याचे नव्हते झाले मोठ्या मेहनतीने व कष्टाने उभा केलेला साऱ्यांचे संसार उध्वस्त झाले जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले अशावेळी त्या दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांना अन्न-धान्य आदी जीवनाश्यक वस्तू ,पाणी,कपडे यांची नितांत आवश्यकता असल्याने धनाजी चाळके यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने" एक हात मदतीचा "म्हणून आपलाही खारीचा वाटा, सहयोग व सहकार्य व्हावे या उदात्त हेतूने प्रेरित होऊन आपल्या वाढदिवसाचे औचित्त साधून एक हात मदतीचा म्हणून दरडग्रस्त आणि पुरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.
याप्रसंगी श्री.सुरेश पवार साहेब (उपअध्यक्ष सह्याद्री बँक) श्री राहुल पेंढारकर साहेब (शिवसेना शाखा प्रमुख किसन नगर ठाणे) श्री.भरत बापू चाळके (उपसरपंच ग्रा. चाळकेवाडी) श्री आनंदा चाळके श्री प्रशांत चाळके (व्यवस्थापक साईराज को .ऑफ . क्रेडिट सोसयटी मुंबई)श्री लक्ष्मण चाळके (शिवसेना शाखा प्रमुख कामोठे) सुनिल बोरगे, श्री राहुल चाळके,विकी चाळके उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा