धामणीत बिबट्याची दहशत : दोन शेळ्यांचा फडशा
प्रतिनिधी / मनोज सावंत
धामणी ता.पाटण धामणी गावठाण (कुंभारवाडा) येथील गणपती मारुती कुंभार या शेतकऱ्याच्या दोन शेळीचा बिबट्याने काल रात्री फडशा पाडला आहे. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.या घटनेची सविस्तर माहिती अशी की गणपती कुंभार हे धामणी गावात राहतात त्याच्या घराच्या बाजूलाच त्याचा शेळी बांधायचा गोठा आहे या गोठयात आज दि.04 रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या घुसला व एका शेळीला बांधलेल्या जागेवरच मारून रक्त पिले तर दुसऱ्या शेळीला मारून फरफटत जंगलात घेऊन गेला.
याबाबत धामणी येथील वनमजूर मुल्ला यांनी वनपाल व्ही.व्ही.डुबल यांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून शासकीय नियमानुसार कुंभार यांना भरपाई मिळेल असे सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत,धामणी ,वझोली,काळगाव परिसरातील नागरी वस्ती व शेतांमध्ये ठिकठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने, ग्रामस्थ धास्तावले आहेत. याबाबतच्या तक्रारी वनविभागाला दिल्या आहेत, बिबट्यांचा बदोबस्त करण्यासाठी पिंजरे तैनात करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी दीपक पाटील ग्रा.सदस्य धामणी यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा