गुरुवार, २५ मार्च, २०२१

ढेबेवाडी -पाटण घाटरस्त्यावर चोरट्यांचा धुमाकूळ महिलेवर चाकुहल्ला करून हिसकावले दागिने

ढेबेवाडी -पाटण रस्त्यावर चोरट्यांचा धुमाकूळ महिलेवर चाकुहल्ला करून हिसकावले दागिने 
ढेबेवाडी / कुमजाई पर्व वृत्तसेवा
 ढेबेवाडी- पाटण घाट रस्त्याच्या माथ्यावर शिद्रुकवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर चारचाकी गाडी थांबवून एका महिलेवर सुऱ्याने हल्ला करून तिच्या आईच्या गळ्यातील सोन्याचे तीन तोळ्यांचे  चैन व माळ हिसकावून नेहल्याची घटना घडली असून याबाबत ढेबेवाडी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.
        याबाबत छाया कोळेकर वय (40) वर्षे शिद्रुकवाडी (खळे) ता.पाटण यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार व घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी छाया यांच्या आई हौसाबाई कोळेकर वय (80) वर्षे यांना आजारी असल्याने तळमावले ता.पाटण येथे एका खाजगी दवाखान्यात नेहले होते.दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दवाखान्यातील इलाज झालेनंतर तिला घरी घेऊन जात असताना  घाट माथ्यावरून शिद्रुकवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिद्रुकवाडी पासून सुमारे एक किलोमीटर पाठीमागे  त्यांच्या चारचाकी गाडीला एकजण हात करत होता व तो पायाने लंगडत होता म्हणून गाडी थांबवली, गाडी थांबवताच त्याने गाडी चालवत असलेल्या अंकुश दिनकर पवार वय (27) वर्षे याच्या गळ्याला सुरा लावला आणि गाडीच्या काचा खाली घेण्यास भाग पाडले आणि गाडीची चावी काढून घेऊन फेकून दिली यानंतर पाठीमागचे दार उघडून हौसाबाई कोळेकर यांच्या गळ्यातील चैन हिसकावून घेतली व दुसरी बोरमाळही हिसकावत होता यावेळी तक्रारदार छाया यांनी प्रतिकार केला व माळ धरून ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्या व्यक्तीने सुरा छाया यांच्या हातावर मारून त्यांना जखमी केले आणि दागिने घेऊन पसार झाला यावेळी अंकुशनेही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत तो इसम टेळेवाडीच्या दिशेने निघून गेला अंकुशने दगड मारून त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला तो इसम डोंगरातून खाली जाताना काही अंतरावर दुसरा एक इसम होता.यानंतर अंकुशने शिद्रुकवाडीतुन काही लोकांना बोलावून घेतले व पोलिसांनाही खबर दिली पोलिसांनी व ग्रामस्थांनी टेळेवाडी पर्यंत जावून शोध घेतला कानोसा घेतला पण ते दिसून आले नाहीत. ही घटना कळताच पाटणचे उपविभागीय अधिकारी अशोकराव थोरात यांनी भेट दिली.घटनेचा सपोनि संतोष पवार तपास करत आहेत

 चौकट : 
         छाया कोळेकर व अंकुश पवार यांनी केलेल्या वर्णनानुसार चैनस्नेचिंग वाले इसमापैकी हिसकावून नेहणारा काळा सावळा  तोंडाला पूर्ण बांधून होता तब्येतीनी तगडा असून डोक्यावर लांब केस होते व    सुमारे साडेपाच फूट उंचीचा होता त्याने अंगात पांढरा शर्ट व काळी पॅन्ट घातली होती तर  डोंगर उतारावर काही अंतरावर असणारा इसम काळा सावळा अंगात काळा शर्ट घातलेला व तगडा होता

----------------//--------------------
पाटण तालुक्यातील आपल्या परिसरातील बातम्यासाठी आपल्या व्हाट्सएपच्या ग्रुप मध्ये ऍड करा 8108253323 
साप्ताहिक कुमजाई पर्व

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...