शनिवार, ६ मार्च, २०२१

काढणे : नारळाचे झाड अंगावर पडून विधुत वितरण कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत

काढणे : नारळाचे झाड अंगावर पडून विधुत वितरणच्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत

काढणे ता.पाटण येथे विजेची मेन लाइनला धोका नको म्हणून, त्याशेजारी असणारे नारळाचे झाड तोडले जात होते, तेच झाड अंगावर पडून विधुत वितरण कंपनीचा कर्मचारी तंत्रज्ञ विशाल कदम वय  (25) अतिशय दुर्दैवीरित्या मृत झाला आहे. तो स्वभावाने अतिशय चांगला होता.आपले काम अतिशय  प्रामाणिक करायचा, अशी लोकांच्यात चर्चा असून याघटनेबाबत तळमावले परिसरात फार हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचा तळमावले परिसरात मोठा मित्रपरिवार होता.
       याबाबत तळमावले विधुत विरण कंपनीचे शाखा प्रमुख बी.एम.शेडे यांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,  विशाल तळमावले
येथील विधुत वितरण कंपनीच्या शाखेत गेली पाच वर्षे तंत्रज्ञ म्हणून सेवेत आहे.काढणे येथे मेन लाईनला अडथळा ठरेल असे नारळाचे झाड होते, पावसा वादळात ते झाड तारेवर पडून मोठा धोका निर्माण झाला असता याची काळजी म्हणून ते धोकादायक झाड आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास तोडण्याचे काम चालू होते .यासाठी काहीजणांना घेवून विशाल गेला होता. नारळाचे झाड कटरने कापून पाडण्याचे काम चालू होते, यावेळी विशाल बाजूला उभा होता, परंतु झाड पडताना फिरले व त्याच्या अंगावर पडले आणि अतिशय दुर्दैवीरित्या विशालचा म्रुत्यु झाला.त्याला कराडला कृष्णा हॉस्पिटल येथे नेहण्यात आले पण त्या आगोदरच त्याची प्राणज्योत मालवली होती.विशाल मूळचा कोयना भागातील तळोशी ता.पाटण या गावचा   असून त्याचे अजून लग्न झाले नव्हते.कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती त्याच्या जाण्यामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. तो नोकरीनिमित्त तळमावले येथे राहत होता.येथे त्याचा मित्रपरिवार मोठा होता.अचानक ही  घडलेली घटनेने वातावरण सुन्न झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च.

ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा व सुव्यवस...