मंगळवार, ९ मार्च, २०२१

तळमावले : उभी बाटली आडवी होणार का?मतदानाला झाले वर्षे : निकाल नाही लागला

तळमावले : उभी बाटली आडवी होणार का?

मतदानाला झाले वर्षे : निकाल नाही लागला 


  साप्ताहिक
 कुमजाई पर्व / प्रतिनिधी
तळमावले ता.पाटण : दि.9 येथील देशीदारूचे दुकान बंद करण्यासाठी घेतलेल्या मतदानाचा निकाल जाहीर करावा, या मागणीसाठी तेथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत निदर्शने केली. याबाबतचे निवेदन महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले .

तळमावले येथील दारूचे दुकान बंद करण्यासाठी सुमारे एक वर्षापूर्वी 26 फेब्रुवारी 2020 ला मतदान प्रक्रिया पार पडली होती. मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या घटनेला एक वर्षे होऊन गेले, तरी त्याचा निकाल प्रशासनाने जाहीर केला नाही. यामुळे गावात अजूनही उभी बाटली असून, त्याचा त्रास सर्वसामान्य कष्टकरी जनतेला सहन करावा लागत आहे.याबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनही योग्य ती कार्यवाही झाली नाही. यामुळे तळमावले येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता.यानुसार आंदोलन करत महिलांनी प्रशासनाचा निषेध केला. याचे निवेदन महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे. यात प्रशासनाच्या भूमिकेविषयी शंका व्यक्‍त करण्यात येत आहे. या आंदोलनात सिताई फाउंडेशनच्या अध्यक्षा.सौ.कविता कचरे, सुजाता ताईगडे, सुमन ताईगडे, इंदुताई शिबे, संगीता ताईगडे, शालन ताईगडे, रूपाली ताईगडे, मालन ताईगडे, सुमन ताईगडे व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा