कुंभारगाव : ता.पाटण जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विश्वकर्मा प्रतिष्ठान कुंभारगाव व प्राथमिक आरोग्य क्रेंद तळमावले यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.या शिबिरामध्ये एकूण 70 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
खास महिला दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी संजिवन मेडिकल सेंटरच्या डॉ. सौ.भाग्यश्री पाटील (सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ ,कराड) यांनी महिलांना आरोग्याच्या संदर्भात मौलिक असे मार्गदर्शन केले.
डॉक्टर आपल्या दारी या उक्तीप्रमाणे
संजिवन मेडिकल सेंटरचा सर्व स्टाफ उपस्थित राहुन महिला,ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली यावेळी कुंभारगाव उपकेंद्राचे डॉ.यादव मँडम देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक - मा श्री सुनील धर्माधिकारी (सुतार) यांनी केले.व सुत्रसंचालन प्रा. सचिन पुजारी सर यांनी केले.
आणि आभार श्री माणिक खटावकर (मिस्त्री) यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे महिला ,विश्वस्त आणि युवा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आणि विशेष सहभाग नोंदवला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा