गुरुवार, २५ मार्च, २०२१

तळमावले : विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई

तळमावले : विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई 
फोटो : अनिल देसाई ,कुंभारगाव
तळमावले प्रतिनिधी : 
तळमावले ता .पाटण दि.24:सातारा  जिल्ह्यासह पाटण तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. तळमावले येथे ग्रामपंचायत आणि ढेबेवाडी पोलीस यांनी  मास्क वापर करा सोशल डिस्टनसिंगचे पालन करा असा नागरिकांना सुचना दिल्या आहेत. पंरतु, नागरिक विना मास्क रस्त्याने फिरत आहेत. यामुळे प्रशासनाने आता दंडात्मक कारवाई करून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला आहे.आणि प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी असताना पिशव्याचा वापर करताना काही दुकानदार सापडले त्याच्या कडून सुद्धा दंड वसूल करण्यात आला.
तळमावले परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना मास्कचा सक्तीने वापर करणे, साबणाने वारंवार हात स्वच्छ धुवून स्वच्छता राखणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासाठी तळमावले बाजारपेठ येथे ग्रामपंचायतच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. परंतु मार्केटमध्ये, रस्त्यावर काही नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने अखेर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली.
यावेळी ग्रामपंचायत ताईगडेवाडी (तळमावले) सरपंच सौ.शोभाताई संजय भुलुगडे. व उपसरपंच श्री.अंकुश अतकरी
 श्री .अजय माने पोलिस हवलदार पोलिस स्टेशन ढेबेवाडी व होम गार्ड विनायक डाकवे , शुभम कचरे तसेच  व सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...