रविवार, ७ मार्च, २०२१

*कराड : प्रा. शारदा घाडगे - यादव यांना पीएचडी पदवी प्रदान*

*कराड : प्रा. शारदा घाडगे - यादव यांना पीएचडी पदवी प्रदान*

कराड दि.7 : वनस्पती शास्त्र व पीक संरक्षण शास्त्र विभाग सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड येथील प्राध्यापिका शारदा जगन्नाथ घाडगे यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तर्फे "पीएचडी" पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी 'ब्लू ग्रीन अल्गल डायव्हर्सिटी ऑफ पॅडी फील्डस फ्रॉम कराड अँड पाटण तहसील, सातारा डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र' या विषयावर संशोधन केले आहे. त्यांना यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथील वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख व माजी उप प्राचार्य प्रो. डॉ. वनिता कारंडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
  त्यांच्या या यशाबद्दल डॉ. डी. टी. शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सद्गुगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स साताराचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव,शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराडचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे (सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), प्राचार्य एस. के. कुंभार माजी सहसचिव अर्थ विभाग श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, सद्गुगुरू गाडगे महाराज कॉलेजचे उपप्राचार्य एस. ए. पाटील, डॉ. एस. आर. सावंत, प्रा. एम.बी. कांबळे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख सौ.एम. व्ही. किशोर, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च.

ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा व सुव्यवस...