कुमजाई पर्व वार्ताहर तळमावले :
महाराष्ट्र टाईम्स च्या 2021 चा मटा सन्मानच्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे नामांकन विठ्ठल डाकवे यांना जाहीर झाले आहे. ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेसाठी हे नामांकन जाहीर झाले आहे. विठ्ठल डाकवे यांनी आतापर्यंत सुमारे 35 हून अधिक मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
मराठी मनोरंजनसृष्टीत अत्यंत मानाचा आणि कलाकारांच्या प्रतिभेला मनःपूर्वक दाद देणारा ‘म.टा. सन्मान 2021’ नेहमीच्याच दिमाखात पुन्हा आला असून पुरस्कारांची वाढलेली व्याप्ती हे यंदाच्या सन्मानचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
‘दामिनी’ तसेच श्री स्वामी समर्थ यांची ‘कृपासिंधू’ या मालिकेपासून विठ्ठल डाकवे हे नांव महाराष्ट्राच्या कानाकोपÚयात पोहोचले आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी मिळालेले नामांकन हे त्यांच्यातील गुणवत्तेला मिळालेली दाद आहे. त्यांना मिळालेल्या या नामांकनामुळे डाकेवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या नामांकनाबद्दल विठ्ठल डाकवे यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा