रविवार, १ नोव्हेंबर, २०२०

"ज्ञान" दान करणाऱयांनाच "मान" धन नाही ; वरिष्ठ महाविद्यालयातील अर्धवेळ शिक्षक वेतनापासून वंचितकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक चणचण

"ज्ञान" दान करणाऱयांनाच "मान" धन नाही ; वरिष्ठ महाविद्यालयातील अर्धवेळ शिक्षक वेतनापासून वंचित

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक चणचण

 वरिष्ठ महाविद्यालयातील अर्धवेळ, तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना नियमित वेतनच मिळत नाही. दोन-अडीच वर्षांपासून काहींना वेतन मिळालेले नाही. यामुळे संबंधित शिक्षकांवर ऐन करोनाच्या संकटाच्या कालावधीत आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. वेतनच मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्‍न शिक्षकांपुढे निर्माण झालेला आहे.वरिष्ठ महाविद्यालयात काम करणारे हंगामी शिक्षक, मानधन तत्वावर काम करणारे शिक्षक व CHB वरती काम करणारे शिक्षक या सर्वांचे जीवन जगण्याची परस्थिती अवघड झाली आहे.
मार्च महिन्यात कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झाली.सात महिने महाविद्यालये बंद आहेत.गेल्या शैक्षणिक वर्षातील तासिका तत्वावरील करार संपुष्टात आला आहे. सात महिने झाले एक रुपयाचे पण मानधन नाही नोकरी प्राध्यापकाची, पण खिशात नाही दमडी अशी विचित्र अवस्था बनली आहे. CHB प्राध्यापक म्हणून नव्याने मुदतवाढीचा विषय निम्मे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी प्रलंबित आहे.कामावर नाही म्हणून सात महिने पगार नाही. CHB प्राध्यापकांनी जगायचे तरी कसे? घरातील लोक टोमणे मारत आहेत एवढे उच्च शिक्षण (SET, NET, M. Phil, Ph. D) घेऊन काय उपयोग नाही.जरी नेमणूक झाली तरी सहा किंवा सात महिने मानधन मिळते आणि मानधन ही वेळेवर भेटत नाही आणि जरी भेटले तरी त्या मानधनामधून नीट संसाराचा गाडा चालवता येत नाही.यासाठी सरकारने लवकरात लवकर आम्हांला या गुलामगिरीतून सोडवावे व या उच्च शिक्षण घेतलेल्या CHB प्राध्यापकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी प्राध्यापकांच्या वतीने करण्यात येत आहे.

मागण्या-

1) वरिष्ठ महाविद्यालयातील CHB प्राध्यापकांची नियुक्ती लवकरात लवकर करावी.

2) इतर राज्यांच्या धर्तीवर अकरा महिन्यांची नियुक्ती देऊन प्रति महिना 25 हजार ते 30हजार मानधन द्यावे व ते प्रति महिना अदा करावे(समान पात्रता -समान काम- समान मानधन )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...