कुंभारगाव (ता.पाटण) दि.20.: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुंभारगाव ग्रामकोरोना समितीने उद्यापासून आठ दिवस जनता कर्फ्यू घोषित केला आहे . त्यामुळे गावातील फक्त दवाखाना, मेडिकल स्टोर चालू राहतील बाकी सर्व प्रकारचे दुकाने बंद राहतील.नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन ग्रामकोरोना समितीने केले आहे . ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंतेत भर पडली आहे . कुंभारगावातच कोरोना रुग्ण आढळल्याने येथील नागरिकांना होणारा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता समितीच्यावतीने अत्यावश्यक सेवा वगळता सोमवार दि २१ संप्टेंबर ते सोमवार दि.२८ संप्टेंबर पर्यंत आठ दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये ,घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे बंधनकारक असून मास्क न वापरणाऱ्या नागरिकाना दंड आकारण्यात येईल.
गावातील सर्व नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे आवश्यक असून , प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन कोरोना समितीकडून करण्यात आले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा