मंगळवार, ३१ मार्च, २०२०

साताऱ्यात ९ तर कराडमध्ये ४ रुग्ण कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल

सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे एकूण २ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तसेच पुणे, मुंबईवरून आलेल्या काहींना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. दि. १५ मार्च नंतर परदेश प्रवास करुन आलेले ७ प्रवासी कोरोना अनुमानित म्हणुन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

सातारा जिल्ह्यातील कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील विलगीकरण कक्षात दि.२८ मार्च रोजी ४८ वर्षीय पुरुषास ताप व श्वसनास त्रास होत असल्याने, दि.२९ मार्च रोजी ८० वर्षीय पुरुष व ४ वर्षीय मुलास श्वसनास त्रास व खोकला असल्याने आणि आज दि.३० मार्च रोजी एका वर्षाच्या मुलीस ताप व खोकला आल्याने दाखल केले आहे

ह्या सर्व 4 रुग्णांना कोरोनाचे अनुमानित रुग्ण म्हणून दाखल केले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक तपासण्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असून उपचार चालु आहेत. हे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील उपचार ठरवण्यात येतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तसेच सातारा जिल्हयातील १ पुरुष व १ महिला असे दोन रहिवाशी इस्लामपुर येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना देखील अनुमानित रुग्ण म्हणुन आज दाखल करून घेण्यात आले. सदर कोरोनासंशयितांचे घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

बाधितांचा आकडा २२० वर

राज्यातील करोना बाधितांचा आकडा आता २२० झाला आहे. काल दिवसभरात १७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर २ जणांचा आज मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे उपचार घेणाऱ्या ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

संख्या खालीलप्रमाणे:

मुंबई - ९२

पुणे -४२

सांगली-२५

मुंबई एमएमआर-२४

नागपूर-१६

यवतमाळ-४

अहमदनगर-५

सातारा-२

कोल्हापूर-३

औरंगाबाद-१

रत्नागिरी-

सिंधुदुर्ग-१

कोल्हापूर-१

गोंदिया -१

जळगाव-१

बुलढाणा-१

एकूण-२२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...