राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस पक्षाच्या वतीने हा दिवस "बळिराजा कृतज्ञता दिन" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. १२ डिसेंबर पवारांचा वाढदिवस असतो. शरद पवार यंदा ८० व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने ८० लाखांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्त केला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष, आमदार नवाब मलिक यांनी दिली. जमा झालेला हा निधी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यासोबत बळिराजा कृतज्ञता कोश देखील तयार केला जाणार आहे
सोमवारी (ता. ९) आयोजित पत्रकार परिषदेत नवाब मलिक बोलत होते. या वेळी ते म्हणाले, की राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हा निधी दिला जाणार असून, अशा प्रकारचा कार्यक्रम वर्षभर राबवला जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा