रविवार, ८ डिसेंबर, २०१९

ढेबेवाडी तळमावले कुंभारगाव ता.पाटण येथे दारू बंदीसाठी महिलांची लढाई ;

ढेबेवाडी कुमजाई पर्व प्रतिनिधी 
गावातील सामाजिक स्वास्थ्य धोक्‍यात आणणारी आणि परिसरात व्यसनाधिनता वाढायला कारणीभूत ठरलेली मंद्रुळकोळे ढेबेवाडी (पाटण) ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व दारू दुकाने व बिअरबार बंद करण्याची मागणी नुकतीच महिलांच्या ग्रामसभेत करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी हात वर करून दारूबंदीचा ठरावही मंजूर केला
.मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र ढेबेवाडी बाजारपेठेच्या परिसरात असून तीन बिअरबार आणि दोन देशी-विदेशी दारू विक्रीची दुकानेही त्यातच समाविष्ट असल्याने या ठरावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मंद्रुळकोळे येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात सरपंच अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत दारूबंदीवर गांभीर्याने चर्चा झाली. गावासह परिसरातील जनतेचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी कार्यक्षेत्रातील दारू दुकाने व बिअरबार बंद करावेत, अशी मागणी यावेळी महिलांनी केली. हात वर करून तसा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

तळमावले,;
 येथील आडव्या बाटलीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तिसऱ्यांदा केलेली स्वाक्षऱ्यांची पडताळणी आणि त्यातून हाती आलेले पहिल्या टप्प्यातील यश यामुळे आंदोलनकर्त्या महिलांचा आत्मविश्वास वाढला असून, ही लढाई यशस्वी होण्यासाठी गुप्त पद्धतीऐवजी खुले मतदान घेण्याची मागणी सिताई फाउंडेशने महिलांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पहिल्या पडताळणीवेळी 15.98 तर दुसऱ्या वेळी 23 टक्के महिलांची उपस्थिती असल्याने तिसऱ्यांदा आलेल्या महिलांच्या अर्जानुसार काही दिवसांपूर्वीच पुन्हा स्वाक्षऱ्यांची पडताळणी झाली. अर्जावर स्वाक्षरी केलेल्या 286 पैकी 178 महिलांनी त्यास हजेरी लावल्याने लवकरच ग्रामसभा होवून मतदान होईल, असा अंदाज आहे.
आडव्या बाटली संदर्भातील यापूर्वीचे शासकीय अध्यादेश, नियमावली याला अनुसरून मतदानाच्या खुल्या पद्धतीचाच विचार होईल आणि ताईगडेवाडीतील बाटली नक्की आडवी होईल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.''
कविता कचरे, अध्यक्षा, सिताई समूह.
कुंभारगाव ; 
ग्रामपंचायत कुंभारगाव आणि परिसरात सुद्धा हीच परिस्थिती आहे 
फरक इतकाच आहे की कुंभारगाव परिसरातील दारूची दुकाने अनधिकृत आहेत दारू चोरून विकली जाते ग्रामपंचायती मध्ये ग्रामसभेत दारू बंदीचा ठराव घेऊन सुद्धा पाठपुरावा केला जात नाही त्यामुळे दारू बंदी होत नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

थकीत कर्ज न भरणाकेल्याने दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल.

कर्ज न भरणार्‍यास दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल. पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत...