मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

*बहुले : श्री प्रल्हाद साळुंखे यांचा सेवापुर्ती निमित्त भव्य सत्कार*

*बहुले श्री प्रल्हाद साळुंखे यांचा सेवापुर्ती निमित्त भव्य  सत्कार*
श्री बहुलेश्वर विद्यालय बहुले , येथील गणित शिक्षक मा. श्री प्रल्हाद साळुंखे यांचा सेवापुर्ती सोहळा मंत्रमुग्ध करणारा, ह्रदयस्पर्शी , व वैभवी सोहळ्याची साक्ष देणारा ठरला. या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून कोयना शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. अमरसिंह पाटणकर व प्रमुख पाहुणे म्हणून शिवम ट्रस्ट, घारेवाडीचे संस्थापक, मा. इंद्रजित देशमुख होते. श्री प्रल्हाद साळुंखे व सौ. अनिता साळुंखे यांचा सेवापुर्तीनिमित्त मा. श्री देशमुखसाहेब यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ , हार,व संपुर्ण  पोशाख देऊन सन्मान करणेत आला.
           या प्रसंगी इंद्रजित देशमुख म्हणाले, शिक्षणातून माणूस घडला पाहिजे. आज पावित्र्याचा स्पर्श नसणाऱ्या पाशवी' ज्ञानाचा पसारा वाढतो आहे त्यामुळे माणूस सैतान होतोय आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना समाजामध्ये घडताहेत म्हणून मुलांना ज्ञानाबरोबरच संस्कार आवश्यक आहेत.
         ते पुढे म्हणाले, श्री साळुंखे सरांचे शैक्षणिक क्षेत्रासोबतच विविध क्षेत्रातील कार्य प्रशंसनीय आहे . सरांच्यासारखे आदर्श माणूस बनण्याचे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले. देशमखसाहेबांच्या अमृतवाणीने उपस्थित भारावून गेले.
सत्काराला उत्तर देताना मा. श्री प्रल्हाद साळुंखे म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व दुर्गम खेड्यात माझा जन्म झाला.सह्यगिरी शिक्षण संस्थेचे संस्थापक मा. डांगेसर व त्यांचे सहकारी यांनी माझे पालकत्व स्विकारले म्हणूनच शिकू शकलो. रोटरी क्लब मुंबई साऊथचे मा. श्री पानस्करसर व श्री डांगेसर हेच माझ्या जीवनाचे शिल्पकार आहेत. म्हणून त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.
 या प्रसंगी त्यांनी आपला शेवटचा संपूर्ण पगार कोयना शिक्षण संस्थेस देणगी म्हणून दिला. त्याचप्रमाणे शिवम ट्रस्ट घारेवाडी यांना दहा हजाराची देणगी दिली.
   या प्रसंगी कु. अवंती पानस्कर , श्री विजय कोळेकर ,श्री राजेंद्र पवार ,श्री शरदराव चव्हाण, श्री नवनाथ पानस्कर, मा श्री अमरसिंह पाटणकर यांनी मनोगते व्यक्त केली.
   या कार्यक्रमास श्री संजिव चव्हाण, श्री निजाम डांगे, श्री सुभाषराव जाधव , सौ. दिपा बोरकर श्री सुरेश चव्हाण, श्री भरत पाटील , श्री महेंद्र जानुगडे  श्री सचिन नलावडे, श्री विलास येळवे , श्री जोतीराम कुंभार, जगन्नाथ विभूते, मनोज मोहिते , सचिन जाधव, विशाल जाधव त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर , नातेवाईक, ग्रामस्थ व खूप मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री कुंभार, सुत्रसंचालन श्री पाटील व सौ. लोहार यांनी केले आभार श्री झोरे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...