पाटण:- संगीतकार सागर जनार्दन यांनी "आई मी येतय गं" 'दिलरुबा' "रुपाची नशा" 'कारभारी' "माझी जाना" या गाण्यांच्या यशानंतर आगळीवेगळी प्रेम कथा मांडलेले "पिरतीच पाखरु" हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत.
या गाण्याचे लेखक रोहन साखरे यांनी नेहमीप्रमाणे अप्रतिम शब्दांमध्ये गाणं लिहीलं असुन,महाराष्ट्राची लाडकी स्टार गायिका "सोनाली सोनवणे",प्रसिध्द गायक 'सागर जनार्दन' यानी गायलं आहे.त्याचबरोबर संगीत संयोजक "प्रमोद महाजन",'स्काय जाधव' यांनी केलेलं आहे.या गाण्याच्या दिग्दर्शनाबरोबरच गाण्याच्या प्रमुख भुमिकेमध्ये सर्वांचा लाडका असलेला ज्यांनी आपल्या एका मिनिटाच्या व्हीडीओ मार्फत समाजात घडणार्या सत्य घटनेच्या आधारावरती सामाजिक संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असणारे ऑडीयन्स स्टार "तन्मय पाटेकर" त्याचबरोबर 'साई जनार्दन',तसेच "रिचा खातु" हे दिसणार आहेत.
या गाण्याच्या माध्यमातुन आयुष्यामध्ये प्रेम हे रंगरुप पाहुन न करता स्वभावाच्या निरागसतेवरती सुध्दा प्रेम करता येऊ शकतं.असा प्रेमाबद्दलचा भावनिक संदेश तन्मय पाटेकर आणि साईसागर एन्टरटेनमेंट यांनी मांडला आहे.तुम्हाला "पिरतीच पाखरु" हे गाण नक्की आवडेल.हे गाणं "साईसागर एन्टरटेनमेंट" या युटुब चॅनलवरती प्रदर्शित झालं आहे,तरी आपण नक्की पहावं.आम्ही अशीच नवनविन आणि अप्रतिम गाणी घेऊन येत राहु असे संगीतकार प्रसिध्द गायक "सागर जनार्दन" यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा