शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

पाटण ; तळमावले येथे दुकानदार व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी सुरू तपासणी करून घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

पाटण ; तळमावले येथे दुकानदार व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी सुरू तपासणी करून घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
तळमावले ता.पाटण: कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी तळमावले (ता.पाटण) येथे विविध प्रकारच्या दुकानदार व व्यापारी वर्गाची प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले येथील वैद्यकीय पथकांकडून कोरोना तपासणी सुरू झाली आहे. पाटण तालुक्‍यात तळमावले हे ग्रामीण भागातील व्यापारी केंद्र असून व्यापाऱ्यांकडून कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून  प्रत्येक व्यापाऱ्याची वैद्यकीय पथकांकडून कोरोना अँटिजेन टेस्ट घेण्यात येत आहे.

व्यापारी व बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या वाढत्या गर्दीचा विचार करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोव्हिड रॅपिड टेस्ट फेर तपासणी मोहिमेअंतर्गत तळमावले ग्रामपंचायत कार्यालयाजवळ व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट घेतली जात असून, यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच बाजारात येणाऱ्या ग्राहकांना सुद्धा याचा फायदा होत आहे.
वेळीच तपासणी केली व लवकर उपचार घेतल्यास कोरोना संसर्ग रोखण्यात व मृत्युदर आटोक्‍यात येण्यास मदत होत असल्याने  संपूर्ण बाजारपेठेत तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून डॉ.गोंजारी व .डॉ.खबाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दरम्यान जे दुकानदार अँटिजेन टेस्ट करणार नाहीत त्यांना दुकान उघडू देऊ नये आशा सूचना प्रशासनाच्या वतीने संबंधित ग्रामपंचायतीनां देण्यात आल्या आहेेेत

एखादा दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह किंवा वाहक असल्यास त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात कोरानाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे तळमावले विभागातील सर्व दुकानदारांनी, विक्रेत्यांनी रॅपिड अँटिजेन टेस्ट करून  प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले येथील डॉ.गोंजारी यांनी केले आहे 
या पथकामध्ये डॉ.गोंजारी व .डॉ.खबाले यांच्यासह आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका आशा,अंगणवाडी सेविका तळमावले ग्रामपंचायतीचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
या पथकामध्ये काम करत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र विभागातील सर्व आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका आशा,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची अँटिजेन टेस्ट यापूर्वीच केलेली आहे. अशी माहिती डॉ.गोंजारी यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...