बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त

मुंबई, दि. 10 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संस्थापन समयलेख आणि संस्थापन नियमातील नियम 82(4) मधील तरतुदीनुसार महामंडळावरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, अशासकीय सदस्य व विशेष निमंत्रित यांच्या नियुक्त्या शासनामार्फत रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र महामंडळामार्फत सुरु असलेल्या योजना निरंतर सुरु राहतील, या योजनांतर्गत लाभार्थ्यांना मिळत असलेल्या व्याज परताव्याचा लाभ यापुढे देखील निरंतर देण्यात येईल, असे महामंडळामार्फत कळविण्यात आले आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर श्री.नरेंद्र अण्णासाहेब पाटील तर उपाध्यक्ष पदावर श्री. संजय मारुतीराव पवार यांची नियुक्ती शासन निर्णय दि. 30 ऑगस्ट, 2018 अन्वये करण्यात आली होती. तसेच शासन निर्णय दि. 20 सप्टेंबर, 2019 अन्वये महामंडळामध्ये संचालकांची नियुक्ती केली होती.

 

महामंडळाच्या योजनांतर्गत 19000 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना विविध बँकांमार्फत विविध व्यवसायांसाठी रु. 1215 कोटींचे कर्ज वितरीत केले आहे व या सर्व लाभार्थ्यांना महामंडळामार्फत रु. 61 कोटींची व्याज रक्कम लाभार्थ्यांच्या बचतखात्यामध्ये जमा करण्यात आली आहे, असे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...