सातारा ; कर्ज वाटपात जामिन किंवा तारण घेण्याची शिफारस नसल्यास त्याची मागणी करुन ग्राहकांना त्रास देवू नये
- जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा दि. 10 : शासकीय योजनांच्या कर्ज वाटपात जामिन किंवा तारण घेण्याची शिफारस नसले तरी काही बँका जामीन व तारण मागून विनाकारण ग्राहकांना त्रास देण्याचे प्रकार समोर येत आहेत, असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत याची खबरादारी सर्व बँकांच्या व्यवस्थापकांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.महामंडळाकील प्रकरणे आहेत ती तातडीने निकाली काढावीत, तसेच जी पेंडींग आहेत त्याची माहिती सादर करावी अशा सूचना करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, खरीप हंगामामध्ये 105 टक्के कर्ज वाटप करण्यात आले होते आहे. रब्बीचेही वाटप बँकांना दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे करावे. ज्या शासकीय योजना बँकांमार्फत राबविण्यात येतात त्या प्रभावीपणे राबविण्यात याव्यात.
आर्थिक साक्षरता करावी
ऑनलाईन फ्रॉड रोखण्यासाठी वर्तमानपत्रे व आकाशवाणी यांच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता करावी व लोकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे यासाठी बँकांनी योग्य ती माहिती द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत केल्या.
या बैठकीस विविध बँकांचे जिल्हा समन्वयक व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
नाबार्डच्या पतपुरवठा आराखड्याचे लोकार्पण
बैठकीच्या प्रारंभी नाबार्डतर्फे तयार करण्यात आलेल्या पुढील वर्षीच्या पतपुरवठा अराखड्याचेही लोर्कापण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
थकीत कर्ज न भरणाकेल्याने दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल.
कर्ज न भरणार्यास दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल. पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा