बुधवार, ११ डिसेंबर, २०१९

सातारा : लाच घेताना लिपिकाला अटक

सातारा प्रतिनिधी : कुमजाई पर्व

तक्रारदाराच्या मंजूर शासकीय अनुदानाचा धनादेश बॅंकेत पाठवण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील लिपिक अंबादास गोविंद कदम (वय 31) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले.

अंबादास कदम हा मूळचा पुणे (फ्लॅट नं. 5, ज्योती पार्क सोसायटी, रामचंद्रनगर) येथील रहिवासी असून त्याची नेमणूक सातारा येथे आहे. सध्या तो राजवाडा येथील सह्याद्री टॉवरजवळ राहत आहे. बॉम्बे रेस्टॉरंट चौकात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे कार्यालय आहे.

तक्रारदाराचा (वय 27) मंजूर शासकीय अनुदानाचा धनादेश बॅंकेत पाठवण्यासाठी कदम याने लाच मागितली होती.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार महामंडळाच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला होता. तेथे कदम याने लाच स्वीकारताच त्याला पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

थकीत कर्ज न भरणाकेल्याने दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल.

कर्ज न भरणार्‍यास दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल. पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत...