सोमवार, २८ एप्रिल, २०२५

कु.संजीवनी कुंभार हिचे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश.


पाटण - मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयातील विद्यार्थीनी कु.संजीवनी संदेश कुंभार (इ.5 वी)या विद्यार्थिनीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 190 गुण मिळविले असून तीने उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती प्राप्त केलेली आहे. 



 याबद्दल तिचे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार श्री शंभूराज देसाई साहेब,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री यशराज देसाई दादा युवा नेते मा .जयराज देसाई दादा मा.आदित्यराज देसाई दादा, संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.विलास कुराडे,सचिव मा श्री.डी.एम.शेजवळ ,लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव मा.श्री.एन.एस.कुंभार ,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल.केंडे,बेलवडे खुर्द केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.संजय आटाळे, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आजी माजी विद्यार्थी व पालक यांनी कु.संजीवनी कुंभार या विद्यार्थिनीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५

तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन साजरा.

 

पाटण तालुक्यातील तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन साजरा.


 

घरात किंवा इतर ठिकाणी आपला चावा घेणारा डास आपल्या सर्वांचा चांगल्या परिचयाचा आहे. डास हा एक छोटासा किटकच आहे. अगदी १५ मि.मी इतक्या लहान आकाराचा! जगभरात डासांच्या सुमारे ३५०० जाती आढळतात. डासांमधील नर पाना-फुलांच्या रसांवर आपली गुजराण करतो, मादी डासाला मात्र अंडयांची व्यवस्थित वाढ होण्याकरीता रक्ताची गरज असते. यामुळेच डास अनेक गंभीर आजारांचे रोगवाहक होतात
जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे साहेब, जिल्हा हिवताप अधिकारी, संजय कुंभार साहेब, तालुका आरोग्य अधिकारी नवनाथ कांबळे साहेब, पाटण तालुका आरोग्य विस्तार अधिकारी केदार देशमुख याच्या मार्ग दर्शनाखाली
जागतिक हिवताप दिनानिमित्त तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृतीपर कार्यक्रमाचे शुकवार (ता. २५) आयोजन करण्यात आले होते. 

 यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन वांगीकर, डॉ.अभय पवार, डॉ.अपर्णा टिकेकर शरद कांबळे, जामसिंग पावरा, समुदाय आरोग्य अधिकारी नितीन माने, अकबर मुल्ला, सुप्रिया यादव, धैर्यशील सपकाळ, आरोग्य सेवक रोहीत भोकरे, स्वप्निल कांबळे, विलास फाळके आरोग्य सेविका रजना कुंभार, विद्या लोहार, सोनाली परीट, सुप्रिया पवार, लॅब टेक लता  पाटील, उज्वला पाटील,आशा सेविका, गटप्रवर्तक आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले, अंडी, अळी, कोष (पाण्यातील अवस्था) व पूर्णावस्था (पाण्याबाहेर) अशा डासांच्या चार अवस्था असतात. या तीनही अवस्था फक्त पाण्यातच जगू शकतात व त्यांच्या वाढीचा कालावधी ८ ते १० दिवसाचा असतो. तर पर्णावस्थेतील डास पाण्याबाहेरराहतो. पूर्णावस्थेतील मादी डासांचे आयुष्यमान साधारणपणे २१ दिवस असते. तर नर डास फक्त ४ ते ५ दिवस जगू शकतात. तसेच डासांपासून संरक्षण न केल्यास हिवताप, डेंगी, चिकुनगुन्या, जपानी मेंदूज्वर, हत्तीरोग असे रोग होण्याची शक्यता असते.

वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन वांगीकर म्हणाले की, प्रत्येक हिवताप बाधीत रुग्णांनी त्यांच्या शरीरातील प्लास्मोडियम परोपजीवीचा संपूर्ण नाश करण्यासाठी हिवतापविरोधी समूळ उपचार घेणे आवश्यक आहे. व्हायर्वेक्स प्रकारच्या हिवतापामधले समूळ उपचाराचा कालावधी १४ दिवसांचा असतो. तर फॅल्सीपेरम प्रकारच्या हिवतापामध्ये समूळ उपचाराचा कालावधी ३ दिवसांचा असतो. हिवतापविरोधी समूळ उपचार प्रत्येक सरकारी रुग्णालयामध्ये मोफत उपलब्ध आहे. डॉक्टरांच्या अथवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपचार पूर्ण करणे आवश्यक आहे. समळ उपचार अर्धवट घेतल्यास त्या रुग्णास हिवतापाचा त्रास पुन्हा पुन्हा होऊ शकतो तसेच या रुग्णांमुळे परिसरात हिवताप पसरण्यास मदत होते.



दरम्यान, झोपताना किटकनाशक भारित मच्छरदाणी वापरा. घराच्या खिडक्यांना बारीक जाळी बसवा. हात, पाय झाकले जातील असे अंगभर कपडे वापरा, आवश्यक तिथे डास प्रतिबंधक अगरबत्तीचा वापर करा, किटकनाशक फवारणी करायाला आलेल्यानां सहकार्य करा. कोरडा दिवस पाळा, डासांचा उपद्रव टाळा, दर आठवडयाला घरातील पाण्याची भांडी रिकामी करा, पाणी साठवायची भांडी आतून स्वच्छ घासून, पुसून घ्या. घरावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावा, घरातील पाणी साठवायच्या टाक्यांना झाकण नसल्यास जुन्या कपडयाने (धोतर, साडी इ.) झाका. असे आवाहन वैद्यकीय अधिकारी यांनी केले.



गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

*महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव सर्व यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा**‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’च्या तयारीचा पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई साहेब यांनी घेतला आढावा*


📍 *सातारा : गुरुवार २४ एप्रिल २०२५*

 सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रथमच 'महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५' मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे.  महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या पर्यटन महोत्सवाच्या तयारीचा आढावा पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब यांनी आढावा घेतला.
        महापर्यटन महोत्सव २०२५ हा महाबळेश्वर होत असून  या २ ते ४  मे या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवास राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणावर येणार आहेत.  त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वय राखून आपापली जबाबदारी चोखपणे राबवावी.  येणाऱ्या समस्या सोडवाव्यात. वाहतूक, कायदा व सुव्यवस्था अंत्यत उत्कृष्ट राहील याबाबत काटेकोर दक्षता घ्यावी.या कार्यक्रमामध्ये यामध्ये हेलिकॉप्टर राईड, लेसर शो, स्वरोत्सव, साहसी उपक्रम, फुड फेस्ट आणि आनंदयात्रा, लहान मुलांसाठी विविध खेळ, कार्निवल परेड, उत्सव महाराष्ट्राचा समृध्द परंपरेचा, किल्ला प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, साहसी व मर्दानी खेळ, टेंटसिटी, ड्रोन शो, योग, वाद्यसंगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, बोट प्रदर्शन आदी कार्यक्रम होणार असून याबाबत व एकूणच महोत्सवाच्या आयोजनाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी असे निर्देश पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब यांनी दिले.
        या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या क्षमा पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी 5अधिकारी विश्वास सिद, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील गाढे आदी उपस्थित होते.

शनिवार, १९ एप्रिल, २०२५

*पाटण : लोकनेत्यांच्या चित्ररथ आणि गौरवयात्रेने पाटण तालुका दुमदुमला शासकीय योजनांच्या यात्रेचा ही केला शुभारंभ...!* *तब्बल पाच तास निघाली मिरवणूक..! *हजारोंच्या संख्येने तालुका झाला लोकनेतेमय..!*




नवारस्ता/प्रतिनिधी
         पाटण तालुक्याचे दैवत आणि महाराष्ट्र राज्याचे पाहिले गृहमंत्री  लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ४२ व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ व गौरव यात्रेची भव्य मिरवणूक पाटण तालुक्यात शनिवारी मोठया उत्साहात पार पडली. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग समुहाचे प्रमुख राज्याचे पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून गत दहा वर्षापासून साकारलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ व गौरव यात्रेचे हे नववे वर्ष असून चित्ररथ व गौरव यात्रेला तालुक्यातील हजारों जनतेने उदंड असा प्रतिसाद दिला.मिरवणूकीत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनतेने रथामधील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पादुकांचे दर्शन घेवून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले. सकाळी ०८.३० वाजता सुरु झालेली ही चित्ररथ व गौरवयात्रा दोन वाजेपर्यंत संपुर्ण तालुकाभर सुरु होती.

 लोकनेत्यांच्या सुनबाई आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई  यांच्यासह  लोकनेत्यांची चौथी पिढी असलेली यशराज देसाई, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा अत्यंत शांततेत पार पडला.
  लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे प्रतिवर्षी मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य पारायण सोहळा आयोजित केला जातो.यावर्षीही २३ एप्रिल रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ४२ व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त गुरुवार दि.२० पासून २३ एप्रिल पर्यंत कारखाना कार्यस्थळावर पारायण सोहळा संपन्न होत आहे. गत दहा वर्षापासून मंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पारायण सोहळयाच्या आदल्या दिवशी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र राज्याकरीता केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख करुन देणेकरीता त्यांच्या कार्याचा चित्ररथ याची गौरवयात्रा व गौरवयात्रेच्या पुढे लोकनेते यांच्या पादुकांचा पालखीरथ असा सोहळा संपन्न झाला. तालुक्यातील तब्बल २२ गावांतून हे चित्ररथ व गौरवयात्रेने मार्गक्रमण केले. यावेळी या गावांच्या आसपासची गावे व वाडयावस्त्यांतील लोकनेतेप्रेमी जनता मोठया संख्येने उपस्थित राहून गौरवयात्रेचे आदरपूर्वक स्वागत केले.

    लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ व गौरवयात्रेमध्ये विविध वाद्य,लोकनेत्यांची आकर्षक पालखी, फटाक्यांची आतषबाजी यामुळे तालुक्यातील सर्व वातावरण दुमदुमुन गेले होते.
तालुक्यातील दौलतनगर कारखाना,
गव्हाणवाडी, चोपदारवाडी, सूर्यवंशीवाडी, पापर्डे, मारूल हवेली, गारवडे बहुले फाटा, सोनाईचीवडी, वेताळवाडी, नावडी, निसरेगांव, निसरे फाटा, आबदारवाडी, गिरेवाडी, मल्हारपेठ, कदमवाडी, नारळवाडी, येराडवाडी, नवसरी, नाडे, आडुळ, येरफळे, म्हावशी,  पाटण, तसेच पाटण पंचायत समिती असा या पालखी सोहळयाचा मार्ग होता.एकूण सुमारे २२ गावातून मार्गक्रमण करणा-या सोहळयाचे मोठया उत्साहात ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करुन लोकनेत्यांच्या पालखी सोहळयाचे महिला वर्गाकडून पूजन या चित्ररथ गौरवयात्रेचे स्वागत करण्यात आले. या सोहळयाच्या मार्गक्रमणावर भगवे झेंडे लावण्याबरोबर प्रत्येक गावामध्ये रांगोळीही काढण्यात आल्या होत्या.
   लोकनेते बाळासाहेब देसाई यांना विनम्र अभिवादन करणारे बॅनर पालखी सोहळयाच्या मार्गावर लक्ष वेधून घेत होते.  लोकनेते यांच्या जीवनावरील विविध विषयांना स्पर्श करणारे आकर्षक चित्ररथ या सोहळयामध्ये सहभागी झाले होते.तर हजारो कार्यकर्ते लोकनेत्यांच्या नावाने जयजयकार करत सोहळयात सामील झाले होते.यामुळे पालखी सोहळयातील संपुर्ण वातावरण लोकनेतेमय झाले होते. तब्बल पाच तास सुरू असलेल्या या अनोख्या मिरवणूकीची सांगता पाटण येथे मंत्री शंभूराज देसाई, यशराज देसाई मंत्री शंभूराज देसाई यांचे ओएसडी सुनील गाडे, प्रांताधिकारी सोपान टोमपे,तहसीलदार अनंत गुरव,यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारो लोकनेते प्रेमी यांच्या उपस्थितीत , अत्यंत उत्साहात संपन्न झाली.



    ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण..!

संपुर्ण मिरवणूकीमध्ये पोलिस प्रशासनाच्यावतीने ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहभागी चित्ररथामध्ये लोकनेत्यांनी साकारलेल्या वास्तू सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.याचवेळी  ठिकठिकाणी महिलांकडून औक्षणही करण्यात येत होते.या अनोख्या सोहळयात प्रत्येक ठिकाणी उत्साही संस्था कार्यकर्त्यांकडून मिरवणूकीत सहभागी झालेल्यांना सरबत,पोहे,चहा,केळी,नाश्ता,आईस्क्रीम अशा अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.


     एकंदरीत दौलतनगर या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्ताने होणा-या पारायण सोहळयाच्या आदल्यादिवशीच लोकनेते यांच्या या चित्ररथ गौरवयात्रेमुळे संपुर्ण पाटण तालुका ख-या अर्थाने लोकनेतेमय झाला. हे वातावरण या ठिकाणी २३ एप्रिलपर्यंत पहावयास मिळणार आहे.गौरवयात्रेत सहभागी झालेल्या लोकनेत्यांच्या पालखीचे आणि लोकनेत्यांच्या पादुकांचे यशराज देसाई यांनी पूजन करून  गौरवरथाच्या मिरवणुकीला सुरवात केली तर  मंत्री शंभूराज देसाई यांनी गौरवयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.

शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथांचा सहभाग..!  

शनिवारी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथी च्या निमित्ताने पाटण मधून याची सुरवात खऱ्या अर्थाने करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे पहिले गृहमंत्री म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी केलेल्या कार्याचे व त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथा सहित  राज्य शासनाच्या २६ विभागांकडील सुमारे १५० योजना व विकासकामांची माहिती देणारे चित्ररथ  यागौरव यात्रेत सहभागी झाले .
    यावेळी या गौरव यात्रेत विविध विभागाचे वरिष्ठ शासकीय अधिकारी कर्मचारी ही   मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 उद्यापासूनच्या पारायण कार्यक्रमात मंत्री देसाई  उपस्थित राहणार..!

 
  राज्याचे पर्यटन,खनिकर्म,आणि माजी सैनिक कल्याण  मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई उद्या दिनांक २० पासून आपण प्रत्यक्ष  पारायण कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


मंगळवार, १५ एप्रिल, २०२५

*जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ*

 


 

 
सातारा, दि. 15: नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शासनाच्या उपाययोजना राबवणे यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवा साजरा केला जाणार आहे. विशेष मोहीम स्वरुपात राबविण्यात येणाऱ्या या लोकाभिमुख उपक्रमात सर्व यंत्रणा व घटकांनी सक्रिय सहभाग घ्या, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
यावेळी त्यांनी कोयना नदीपात्रात जलपुजन करुन जल है तो कल है चा संदेश दिला. 15 एप्रिल रोजी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्घाटन करुन 30 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रम या उपक्रमांतर्गत घेण्यात येणार आहेत. या उपक्रम शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे,  यशराज देसाई ,  विशेष कार्य अधिकारी सुनील गाढे ,आदी उपस्थित होते.
यामध्ये 16 एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण व ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे, 17 एप्रिल रोजी स्वछ व सुंदर माझे कार्यालय, जल पुनर्भराग, 18 एप्रिल रोजी शेतकरी/पाणी वापर संस्था संवाद, दिनांक 19 एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन इ. अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी, दिनांक 20 एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान, दिनांक 21 एप्रिल रोजी उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारीची निरसन करण्यात येणार आहे.
दिनांक 22 एप्रिल रोजी अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणे शोध घेऊन कार्यवाही करणे, दिनांक 23 एप्रिल रोजी जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धतीबदल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन इ. बाबत बैठक/कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रम, दिनांक 24 एप्रिल रोजी सिंचन ई-प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी व वसुली, थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा, दिनांक 25 एप्रिल रोजी विद्यापीठ/केव्हीके/ सेवाभावी संस्था यांचे समवेत संवाद व कृती कार्यक्रम, दिनांक 26 एप्रिल रोजी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण व पाण्याच पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याबद्दल प्रकरणांचा शोध घेणे,दिनांक 27 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन करण्यात मार्गदर्शन (पूर/मालमत्तेचे रक्षण),दिनांक 28 एप्रिल रोजी महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे महामंडळाचे नावे संपादित जमिनींच्या 7/12 उताऱ्यावर नोंदी घेणे/अतिक्रमण निष्कासन दिनांक 31 मे पूर्वी हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

*कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन* *पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद*

 



 
सातारा, दि. 15: कोयना दौलत डोगरी महोत्सवाचे 15 ते 17 एप्रिल या कालावधीत दौलतनगर मरळी ता.पाटण येथे आयोजन करण्यात आले आहे. अभिनव संकल्पना राबवत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या महोत्सवाच्या उद्घटनाचा सन्मान शेतकऱ्यांना दिला. पाच शेतकऱ्यांनी सपत्नीक या महोत्सवाचे उद्घाटन केले.
या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी विश्वास सिद, विभागीय वन अधिकारी एच.एस. वाघमोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी सारखर कारखान्याचे संचालक यशराज देसाई, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्धाटन प्रसंगी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, डोंगरी भागातील नागरिक शहरात जावून या उपक्रमांचा लाभ घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रतील हा पहिलाच डोंगरी महोत्सव आहे. कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे स्टॉलही आहेत. या महोत्सवामध्ये पशु-पक्षी प्रदर्शन, घोडेस्वार, वॉटर स्पोर्ट, इलेक्ट्रिक बग्गी, पॅरालायडींग अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
महाबळेश्वर महापर्यटन उत्सव 2 ते 4 मे या कालावधीत पार पडणार आहे. या उत्सवात उद्योजकांबरोबर बचत गटांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. हेलीकॉप्टर राईड, शस्त्र प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमासह, महाबळेश्वर बाजार पेठेतून शोभा यात्रा असे पर्यटकांच्या आकर्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या पुढे प्रत्येक वर्षी महसूल विभागात महापर्यटन महोत्सव राबविण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा महिला बचत गटांच्या महिलांनी लाभ घ्यावा. ज्या बाबी केवळ आपण मोठ्या शहरांमध्ये पाहत आले आहेत त्या सर्व या महोत्सवाच्या निमित्ताने आपण डोंगरी भागातील लोकांना अत्यंत अल्प शुल्क मध्ये उपलब्ध करुन दिले आहेत. अत्यंत चांगले कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. महिला बचत गटांनी उत्पादित मालाला बाजार पेठ देण्याच्या दृष्टीने आपण पाचगणी येथे सातारा जिल्ह्यातील पहिला मॉल उभा करत आहोत. या ठिकाणी परदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. याचा आदर्श घेऊन सर्व जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालासाठी मॉल उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत. याची सुरुवात सातारा जिल्ह्यातून आपण पहिल्यांदा केली याचा मनस्वी आनंद आहे. महिला अत्यंत सृजनशील असतात तुमच्या सर्व नाविन्यपूर्ण कल्पनांना माझा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पाठींबा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

 
कोयना दौलत डोंगरी महोत्सवात महाराष्ट्राती पहिले फळांचे गाव धुमाळवाडीची प्रतिकृती, महात्मा गांधी रोजगारहमी योजनेंतर्गत बांबू लागवड, ऊस पाचट व्यवस्थापन, अन्न-पौष्टिक तृणधान्य महत्व, एकात्मिक फालेत्पादन विकास अभियान, महाडिबीटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना, राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय व्यवस्थापक, पर्यटन संचालनालय, कृषी विज्ञान केंद्र, अन्न प्रक्रिया उद्योग, मत्स्य पालन, भात उत्पादन, खादी ग्रामोद्योग, रेशीम शेती एकात्मिक कीड व्यवस्थापन यासह अनेक शेतकऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या स्टॉची उभारणी करण्यात आली आहे. या स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी प्रगत शेती कशी करावी या विषयी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तसेच कृषी औजारे, कृषी संलग्न वाहने, बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री व्हावी यासाठी या महोत्सवात स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

शुक्रवार, ११ एप्रिल, २०२५

पाटण - कु.राजवीर भिसे राज्यात तृतीय.

 

पाटण - मंथन स्पर्धा परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून या स्पर्धा परीक्षेत सुयश मेडिकल अँड चॅरिटेबल सोसायटी संचलित,रघुकुल बालमंदिर व प्राथमिक विद्यालय नाडे नवारस्ता या विद्यालयातील इयत्ता २री मध्ये शिकत असणारा राजवीर भिसे हा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तिसरा आलेला आहे, तसेच तो आय एम विनर या स्पर्धा परीक्षेमध्ये जिल्ह्यात पहिला आला असून अभिरूप स्कॉलरशिप परीक्षामध्येही त्याने जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवला आहे,याबद्दल त्यांचे    रघुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  मा.डॉ.श्री.विजय देसाई सर,संस्थेचे सचिव मा.सौ. डॉ.रूपाली देसाई मॅडम, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सविता सुर्वे , मार्गदर्शक शिक्षक श्री.महेश पाटील सर, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,आजी माजी विद्यार्थी पालक  यांनी त्याचे अभिनंदन केले, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


गुरुवार, १० एप्रिल, २०२५

नाडे नवारस्ता - मंथन परीक्षेत कु. शौर्या कदम राज्य गुणवत्ता यादीत.

 मंथन परीक्षेत कु. शौर्या कदम राज्य गुणवत्ता यादीत.


 
पाटण - फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन  स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये रघुकुल बालमंदिर व प्राथमिक विद्यालय नाडे नवारस्ता या विद्यालयातील इयत्ता २री मध्ये शिकत असणारी कु. शौर्या संतोष कदम या विद्यार्थ्यांनीने राज्य गुणवत्ता यादीत ७वा क्रमांक व सातारा जिल्ह्यात दुसरी आलेली आहे, या अगोदर तिने आय.एम.विनर या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यात तिसरा क्रमांक ,तसेच अभिरूप स्कॉलरशिप परीक्षा मध्ये केंद्रात पाहिला क्रमांक    मिळविलेला आहे,
कु.शौर्या कदम हिचे वडील माध्यमिक शिक्षक असून आई गृहिणी आहे,तसेच तिचे आजोबा सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत,या स्पर्धा परीक्षेमध्ये तिला श्री.महेश पाटील सर यांचे बहुमोल  असे मार्गदर्शन मिळाले.
याबद्दल तिचे  महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री नामदार श्री.शंभूराज देसाईसाहेब ,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.रविराज देसाई दादा, रघुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  मा.डॉ.श्री.विजय देसाई सर,संस्थेचे सचिव मा.सौ. डॉ.रूपाली देसाई मॅडम, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सविता सुर्वे , मार्गदर्शक शिक्षक श्री.महेश पाटील सर, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,आजी माजी विद्यार्थी पालक ,यांनी तिचे अभिनंदन केले, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची जोरदार तयारी सुरु.

 कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची जोरदार तयारी सुरु.

कोयना दौलत डोंगरी महोत्सव १६ ते १७ एप्रिल २०२५ कालावधीत पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दौलतनगर मरळी या ठिकाणी होणार आहे. या महोत्सवाची  प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे.
  महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती पाटण व जिल्हा प्रशासनाच्यावतीने दौलत नगर येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये कृषी प्रदर्शनाबरोबर पशुपक्षी प्रदर्शनाचे, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे स्टॉलही असणार आहेत. कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये घोडे सवारी, वॉटर स्पोर्ट, इलेक्ट्रिक बग्गी , आनंदमेळा त्याचबरोबरकोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या सांगता कार्यक्रम यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.  
या कोयना दौलत डोंगरी महोत्सवाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी उपस्थित रहावे यासाठी महोत्सवाच्या माहितीसाठी पारंपरिक माध्यमे, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच  विविध समाज माध्यमांद्वारेही माहिती देण्यात येत आहे.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...