पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबाचे विशेष कार्य अधिकारी व पाटण शहरातील प्रतिष्ठित नागरिक श्री मिलिंद पाटील , व साजिद इनामदार यांचे यशस्वी मध्यस्थी मुळे पाटण शहरातील पाणी प्रश्न तात्पुरता मिटला आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबाचे विशेष कार्य अधिकारी व पाटण शहरातील प्रतिष्ठित नागरिक श्री मिलिंद पाटील , व साजिद इनामदार यांचे यशस्वी मध्यस्थी मुळे पाटण शहरातील पाणी प्रश्न तात्पुरता मिटला आहे.
कोयना कराची एकूण थकबाकी 37.84 लक्ष असल्यामुळे कोयना जलसिंचन विभागामार्फत पाणी पुरवठा योजना सीलबंद केली होती.
37.84 लक्ष थकबाकी पैकी सुमारे 10 लक्ष रकमेचा भरणा करण्यात आल्यामुळे तसेच 32 मार्च पर्यंत 4 लक्ष रुपये भरण्यात येणार असून आणखी 6 लक्ष रुपये पुढील 3 महिन्यात भरण्याची हमी दिल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात सदर पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. पाणी कराच्या थकबाकीमुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता झाली होती.तथापि,पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली विशेष कार्य अधिकारी श्री सुनील गाढे व स्थानिक शिवसेनेचे नगरसेवक श्रीमती शैलजा पाटील व श्रीमती अस्मा इनामदार यांनी या प्रश्नात यशस्वी मध्यस्थी केल्याने पाटण शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मिटल्याने पाटण शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.