शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२५

मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या उपस्थितीत शनिवार, १ फेब्रुवारी रोजी जनता दरबाराचे आयोजन.

 मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या उपस्थितीत शनिवार, १ फेब्रुवारी रोजी जनता दरबाराचे आयोजन.



महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या उपस्थितीत शनिवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०१ वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय योजना तसेच विकासकामे व अन्य बाबींतील जनतेच्या अडी-अडीचणी सोडवण्याच्या दृष्टीने मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या उपस्थितीत या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबाराचा लाभ नागरिक बंधू-भगिनींनी घ्यावा, असे आवाहन आहे.
 


शनिवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२५

 दुपारी ०१.०० वाजता

 शिवविजय सभागृह, दौलतनगर-मरळी, ता. पाटण

सोमवार, २० जानेवारी, २०२५

प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी.

 प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी. 


 


सातारा दि.१९  जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सुटीच्या दिवशी
सातारा शहरातील महत्वाच्या ठिकाणी भेटी दिल्या...

आज सातारा जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांनी युद्ध स्मारक, पोवई नाका शिवसृष्टी, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील उड्डाण पूल आणि अजिंक्यतारा परिसरास भेट देऊन पाहणी केली. तसेच या संदर्भात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केली.
26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्याने शाहू स्टेडियम, शहरातील रस्ते त्यांची स्वच्छता व विद्युत रोषणाई संदर्भात मुख्याधिकारी श्री अभिजित बापट याना सूचना दिल्या. अजिंक्य तारा  परिसराची देखील पाहणी जिल्हाधिकारी सातारा यांनी केली आहे.याप्रसंगी जिल्हाधिकारी सातारा यांचे समवेत पालकमंत्री यांचे कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी सुनील गाढे ,रविराज जाधव हे देखील उपस्थित होते.

रविवार, १९ जानेवारी, २०२५

प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावेशासकीय योजनांची माहिती होण्यासाठी चित्ररथ तयार करा - पालकमंत्री शंभूराज देसाई.

प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे
शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी चित्ररथ तयार करा - पालकमंत्री शंभूराज देसाई.

सातारा, दि.19 : यंदाचा प्रजासत्ताक दिन दिमाखादार साजरा व्हावा.  यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमास शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या सारख्या योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती चित्ररथावर  दर्शविण्यात यावी. प्रजासत्ताकदिनी चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभातील संचलनाबरोबर शहरातही फिरवावेत. यासाठी प्रशासकीय विभागाने समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
प्रजासत्ताक दिनाच्या नियोजनाचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील , पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील गाढे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रमाची सर्व प्रथम सातारा जिल्ह्यात सुरुवात करून या उपक्रमांतर्गत २९ हजार नागरिकांना थेट लाभ देण्यात आला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत एकट्या  सातारा जिल्ह्यात  8 लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ देऊन सातारा जिल्ह्यात उत्तम कामकाज करण्यात आले आहे. 26 जाणे  ला या दोन्ही योजनांवर आधारित चित्ररथ तयार करावा. या चित्ररथावर तालुकानिहाय लाभार्थ्यांची ठळक आकडेवारी द्यावी. तसेच मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट सुरु झाले आहे त्याचे फोटो असणाराही चित्ररथ तयार करावा.  कृषी व जिल्हा परिषदेनेही आपल्या विभागाशी संबंधित बांबू रोपण व इतर महत्वाच्या विषयाशी संबंधित चित्ररथ तयार करावेत. या चित्ररथांचे प्रजासत्ताकदिनी संचलन झाल्यानंतर हे चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी शहरात देखील  फिरवावे. शासकीय इमारतींसह शिवतिर्थ, राजवाडा अशा महत्वाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करावी. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करावे. शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात सातारा जिल्हा अग्रेसर राहिला आहे. यापुढेही अशाच पद्धतीने काम करा, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...